नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: शेअर बाजारातील (Investment in Share Market) स्वस्त किमतीच्या शेअर्सनी अर्थात पेनी स्टॉक्सनी (Investment in Penny Stocks) गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न दिला आहे. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकता. पेनी स्टॉक हे असे स्टॉक आहेत जे खूप स्वस्त आहेत आणि ज्यांचे बाजार मूल्य कमी आहे. आजकाल अनेक मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
पेनी स्टॉक म्हणजे काय? (What is Penny Stocks)
25 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्टॉकला पेनी स्टॉक म्हणतात. हे स्टॉक खूप स्वस्त असतात आणि त्यांचे बाजार मूल्य देखील कमी असते. या शेअर्सची किंमत साधारणपणे ₹25 च्या खाली असते, ज्यामुळे ते गुंतवणूकदारांसाठी आकर्षक असतात. मात्र या स्टॉक्समध्ये जोखीमही तितकीच आहे.
1.5 वर्षात 5150% परतावा दिला
ज्या स्टॉकबाबत आपण भाष्य करत आहोत तो देखील पेनी स्टॉक आहे. टाटा टेलिसर्व्हिस (महाराष्ट्र) लिमिटेड (Tata Teleservices (Maharashtra) Limited Share Price) च्या शेअरबद्दल आम्ही बोलत आहोत. टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडच्या शेअरने अवघ्या दीड वर्षात त्यांच्या भागधारकांना 5150% परतावा दिला आहे.
हे वाचा-Stock Market Crash: या प्रमुख कारणांमुळे शेअर बाजार गडगडला,कोरोनाचा असाही परिणाम
₹1.85 चा शेअर पोहोचला 97 रुपयांवर
या मल्टीबॅगर स्टॉकची किंमत ₹1.85 (एनएसईवर 3 एप्रिल 2021 रोजी बंद किंमत) प्रति शेअर होती. या स्तरावरुन आता ही किंमत ₹97.25 (एनएसईवर 25 नोव्हेंबर 2021 रोजी बंद किंमत) वर पोहोचली आहे.
अलीकडेच शेवटच्या पाच व्यवहाराच्या सत्रात या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 21.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. जी आतापर्यंतच्या सत्रात 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटपर्यंत गेली आहे. गेल्या महिनाभरात हा टेलिकॉम पेनी स्टॉक जवळपास 53 रुपयांवरुन 97 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत 85 टक्क्यांची वाढ या शेअरमध्ये झाली आहे.
6 महिन्यात 600% रिटर्न
गेल्या सहा महिन्यांच्या हा पेनी स्टॉक जवळपास 13.55 रुपयांवरुन 97 रुपयांवर पोहोचला आहे. या दरम्यान भागधारकांना 600 टक्क्यांचा रिटर्न मिळाला आहे. गेल्या एका वर्षात या मल्टीबॅगर पेनी स्टॉकने 7.45 रुपयांवरुन 97.25 रुपयांची पातळी गाठली आहे. या कालावधीत जवळपास 1200 टक्क्यांची वाढ झाली आहे.
हे वाचा-कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शेअर बाजारावर परिणाम झाल्यानंतर सोनं वधारलं
1 लाखाचे झाले 52 लाखापेक्षाही जास्त
जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये सहा महिन्यापूर्वी 1 लाखाची गुंतवणूक केली असेल तर त्याचे 1 लाख आज 7 लाख झाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने यात दीड वर्षापूर्वी 1 लाख गुंतवले असतील तर त्याच्या एक लाखाचे आजपर्यंत 52.50 लाख रुपये झाले असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Share market