जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शेअर बाजारावर परिणाम झाल्यानंतर सोनं वधारलं, Gold मध्ये मोठी तेजी

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शेअर बाजारावर परिणाम झाल्यानंतर सोनं वधारलं, Gold मध्ये मोठी तेजी

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शेअर बाजारावर परिणाम झाल्यानंतर सोनं वधारलं, Gold मध्ये मोठी तेजी

कोरोना विषाणूच्या नव्या व्हॅरिएंटचा (coronavirus new variant latest news) परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. याशिवाय सोन्याच्या किमतीही याच घडामोडीदरम्यान वधारल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: भारतीय शेअर बाजारात (Indian Share Markets latest updates) आज (Share market on 26 November) मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजाराचं कामकाज सुरू होताच लगेचच बाजार कोसळला. याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर (Gold Price Today) देखील पाहायला मिळतो आहे. गुरुवारी सोन्याचा भाव 47,444 रुपयांवर बंद झाला होत आणि आज तो 156 रुपयांच्या वाढीसह 47,600 रुपये प्रति तोळाच्या स्तरावर उघडला. यात नंतर 314 रुपयांची आणखी वाढ झाली आहे. सोन्यासह चांदीचे दरही वधारले (Silver Price Today) आहेत. गुरुवारी चांदीचा भाव 63,150 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता, जो 70 रुपयांनी वाढून 63,215 रुपये प्रति किलो झाला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या व्हॅरिएंटचा (coronavirus new variant latest news) परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. ऑटो, बँक आणि ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्सवर सर्वांत जास्त परिणाम झाला आहे. याशिवाय सोन्याच्या किमतीही याच घडामोडीदरम्यान वधारल्या आहेत. हे वाचा- LPG Connection: आधार कार्डवर मिळवा एलपीजी कनेक्शन, वाचा काय आहे प्रक्रिया एमसीएक्सवर काय आहे सोन्याचा भाव? मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Rate on MCX) डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.61 टक्क्यांनी वाढून 47,710 रुपये प्रति तोळा झाला आहे. आजच्या व्यवहारात चांदी 0.05 टक्क्यांनी घसरली आहे, आज 1 किलो चांदीचा भाव 63,117 रुपये आहे. हे वाचा- Interesting Fact: ‘या’ कारणामुळे जगात झाला होता Cryptocurrency चा उदय रेकॉर्ड स्तरापेक्षा 8000 रुपयांनी सोनं स्वस्त गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचले होते. आज सोन्याचे दर 47,600 ते 47900 रुपये प्रति तोळा या दरम्यान ट्रेड करत आहेत. अर्थात रेकॉर्ड हायपेक्षा सोन्याचा भाव जवळपास 8000 रुपयांनी कमी आहे. त्यामुळे सोनेखरेदीचा विचार तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात