नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: भारतीय शेअर बाजारात (Indian Share Markets latest updates) आज (Share market on 26 November) मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजाराचं कामकाज सुरू होताच लगेचच बाजार कोसळला. त्यानंतर दर मिनिटाला वेगाने घडामोडी घडू लागल्या. मुंबई शेअर बाजाराच्या (Mumbai Share Market) सेन्सेक्स (Sensex) या निर्देशांकात जवळपास 1300 अंकांची घसरण झाली आणि 57,814च्या स्तरावर त्याचं ट्रेडिंग (Sensex Trading) सुरू होतं. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (National Share Market) निफ्टी (Nifty Trading) या निर्देशांकामध्येही जवळपास 300 अंकांची घसरण होऊन 17,145च्या पातळीवर ट्रेडिंग सुरू होतं. बाजारतज्ज्ञांचं म्हणणं आहे, की जगभरात कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटमुळे खळबळ उडाली असून, त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे.
दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या नव्या व्हॅरिएंटचा (New Corona Variant) संसर्ग झालेले नवे रुग्ण आढळल्यानंतर जगभर खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेतले व्हायरॉलॉजिस्ट ट्यूलिओ डी ओलिव्हेरा यांनी सांगितलं, की दक्षिण आफ्रिकेत मल्टिपल म्युटेशन असलेला कोरोनाचा व्हॅरिएंट आढळला आहे. त्यानंतर ब्रिटनने सहा आफ्रिकी देशांमधली विमान वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा हा नवा व्हॅरिएंट पहिल्यापेक्षा जास्त घातक असल्याचं समजलं जात असून, तो वेगाने पसरत आहे. या नव्या व्हॅरिएंटबद्दल चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या व्हॅरिएंटवर लसही प्रभावी ठरत नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
हे वाचा-Savings Vs Current | सेव्हिंग अकाउंट की करंट अकाउंट तुमच्या फायद्याचं कोणतं?
कोरोना विषाणूच्या नव्या व्हॅरिएंटचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. ऑटो, बँक आणि ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्सवर सर्वांत जास्त परिणाम झाला आहे. उप-सूचकांक अर्थात Sub-Indexes 1.5 टक्का आणि 1.7 टक्क्यांच्या दरम्यान ट्रेड करत आहेत. निफ्टी फार्मा इंडेक्स हा एकमेव सब-इंडेक्स होता, जो 2 टक्के वाढीसह काम करत आहे.
सकाळी 10.30 वाजता मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या निर्देशांकात तमाम कंपन्या लाल निशाणीसह ट्रेड करताना दिसत होत्या. अपवाद होता तो फक्त डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्या स्टॉकचा. या शेअरचं मूल्य 2.71 टक्क्यांनी वाढून 4717 वर ट्रेडिंग सुरू होतं. निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या 50पैकी 47 स्टॉक्समध्ये घसरण झाली. इथेही डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी, सिप्ला आणि Divilab या फार्मा कंपन्या हिरव्या निशाणीसह ट्रेड करत होत्या.
ऑटो सेक्टरमधल्या कंपन्यांचे शेअर्स एकामागून एक घसरत चालले होते. सर्वांत जास्त घसरण टाटा मोटर्सच्या स्टॉकमध्ये नोंदवली गेली. TATAMOTORS च्या स्टॉकच्या मूल्यात 5.33 टक्के घसरण होऊन 466 वर ट्रेडिंग सुरू होतं. मारुती कंपनीच्या शेअरमध्ये 4.17 टक्के, तर ओएनजीसीच्या शेअरमध्ये 4 टक्के घसरण पाहायला मिळाली. टाटा स्टीलचा स्टॉक 3.85 टक्के घसरणीसह 1126 रुपयांवर हिंदकळत होता. बाजारतज्ज्ञांच्या मते, भारतीय शेअर बाजारात झालेल्या घसरणीमागे अनेक आंतरराष्ट्रीय कारणं आहेत. कोरोना विषाणूचा नवा व्हॅरिएंट हे कारण आहेच. त्यासोबतच कच्च्या तेलाच्या किमतींत घसरण, मेटल आणि फायनान्शिअल बेंचमार्कमध्ये घसरण आणि आशियाई बाजारांमध्ये झालेलं नुकसान यांचा परिणाम भारतीय बाजारावर झालेला पाहायला मिळत आहे.
हे वाचा-Interesting Fact: 'या' कारणामुळे जगात झाला होता Cryptocurrency चा उदय
आशियाई बाजारात घसरण
युरोपात कोरोना विषाणू पुन्हा सक्रिय झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. युरोपातले अनेक देश विमानांच्या उड्डाणांवर बंधनं घालण्याच्या तयारीत आहेत. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर दिसत आहे. हवाई प्रवासावर निर्बंध येणार असल्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. त्यामुळे आशियातल्या अनेक शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. जपानी निक्केई 225मध्ये (Japanese Nikkei) 800 हून अधिक अंकांची घसरण होऊन आज तो 28,700 वर लाल निशाणीसह ट्रेड करत होता. ऑस्ट्रेलियाच्या एस अँड पी एएसएक्स 200मध्येही (Australian S&P ASX) मोठी घसरण झाली. ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजार 128 अंकांनी घसरला होता. शांघाय कंपोझिट इंडेक्स (Shanghai Composite Index) 0.6 टक्क्याने घसरून 3,562.09 अंकांवर आला.
कच्च्या तेलाच्या दरांत घसरण
कच्च्या तेलाच्या किमतींचा भारतीय बाजारावर थेट परिणाम होतो. तेल्या किंमतींमध्ये शुक्रवारी एक टक्क्याहून अधिक घसरण झाली. ब्रेंट क्रूडचे फ्यूचर्स 1.2 टक्के घसरून 81.26 डॉलर प्रति बॅरलवर आले. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट (डब्ल्यूटीआई) क्रूड 1.35 डॉलर किंवा 1.7 टक्क्याच्या घसरणीसह 77.04 डॉलर प्रति बॅरलवर होता.
हे वाचा-PNB Mega E-auction: स्वस्तात खरेदी करा घर! ही बँक आज देतेय संधी; वाचा सविस्तर
मेटल आणि फायनान्शियल सेक्टरवर दबाव
निफ्टी मेटल इंडेक्स सकाळी 10.40ला तीन टक्के खाली होता. त्यात समाविष्ट असलेले सर्व शेअर्स लाल रंगावर ट्रेड करत होते. निफ्टीवर सर्वांत जास्त रिटर्न्स देणाऱ्या फायनान्शियल्समध्येही शुक्रवारी खूप विक्री होत असल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी (26 नोव्हेंबर) निफ्टी बँक इंडेक्समध्ये 2.9 टक्के घसरण पाहायला मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Share market