• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • उद्यापासून बदलणार बँकिंग,टॅक्ससंदर्भातील हे नियम; कामाचा खोळंबा टाळण्यासाठी जाणून घ्या काय आहेत बदल?

उद्यापासून बदलणार बँकिंग,टॅक्ससंदर्भातील हे नियम; कामाचा खोळंबा टाळण्यासाठी जाणून घ्या काय आहेत बदल?

Changes from 1st july 2021: 1 जुलै 2021 (1st July 2021) पासून काही महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत. आर्थिक कामांचा खोळंबा टाळण्यासाठी तुम्हाला हे नियम माहित असणं अत्यावश्यक आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 30 जून: 1 जुलै 2021 (1st July 2021) पासून काही महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत. आर्थिक कामांचा खोळंबा टाळण्यासाठी तुम्हाला हे नियम माहित असणं अत्यावश्यक आहे. कारण या बदलांचा सामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे. बँकिंग, इन्कम टॅक्स, गॅस सिलेंडरच्या किंमती (LPG Price) यासह रोजच्या जीवनाशी निगडीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. याशिवाय सेव्हिंग स्कीम व्याजदराबाबत आज बैठक होईल, सरकारकडून या बैठकीत व्याजदरात कपात केली जाऊ शकते. 1. SBI ग्राहकांना कॅश काढणं पडेल महागात- एसबीआय (State Bank of India) बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेधारकांना दरमहा चार वेळा मोफत पैसे काढता येतील. ज्यात एटीएम आणि बँक शाखांचा समावेश आहे. मोफत मर्यादेनंतर बँक प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अधिक जीएसटी घेईल. पैसे काढण्यावर शुल्क होम ब्रँच, एटीएम आणि गैर एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यावर लागू होईल. 2. SBI चेकबुक शुल्क- -SBI BSBD खातेधारकांना एका फायनान्शिअल इयरमध्ये 10 चेकची कॉपी मिळते. आता 10 चेकच्या चेकबुकवर चार्जेस द्यावे लागतील. 10 चेकच्या पानांसाठी बँक 40 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारेल. 25 चेक लीवसाठी बँक 75 रुपये आणि जीएसटी चार्ज करेल. इमर्जन्सी चेकबुकवर 10 पानांसाठी 50 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवर नवीन सेवा शुल्कातून सूट दिली जाईल हे वाचा-Gold Price Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी उतरले सोन्याचे दर, चांदीचीही स्वस्त 3. बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी- 2019 मध्ये विजया बँक आणि देना बँकेचं विलिनीकरणार बँक ऑफ बडोदामध्ये झालं होतं, ज्यानंतर बँकेकडून नवीन आयएफएससी कोड (New IFSC Code) जारी करण्यात आले आहेत.  30 जूननंतर देना आणि विजया बँकेच्या ग्राहकांचे कोड काम करणार नाहीत. तुम्ही 1 जुलैपासून जुन्या कोडचा वापर करून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाहीत.  बँक विलिनीकरणानंतर कोड्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत बँकेकडून अशी सवलत देण्यात आली होती की तुम्ही जुना कोड वापरू शकता, मात्र 1 जुलैपासून तुमचे जुने आयएफएससी कोड काम करणार नाहीत. 4. सिंडिकेट बँकेच्या शाखांचा IFSC कोड बदलणार- सिंडिकेट बँकेचं 1 एप्रिल 2020 पासून कॅनरा बँकेत (Canara Bank) विलीनीकरण झालं आहे. त्यामुळे आता 1 जुलैपासून बँकेचा IFSC कोड बदलणार आहे. सिंडिकेट बँकेचा सध्याचा IFSC कोड 30 जून 2021 पर्यंतच सुरू राहील. त्यानंतर 1 जुलै 2021 पासून बँकेचा नवा IFSC कोड लागू होईल. सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना आता नवा IFSC कोड घ्यावा लागेल. तसंच जुनं चेकबुकही वापरता येणार नाही. एनईएफटी/ आरटीजीएस/ आयएमपीएस मधून फंड ट्रान्सफर करण्यासाठी या ग्राहकांना कॅनरा बँकेच्या आयएफएससी कोडचा वापर करावा लागेल. हे वाचा-ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर! स्पेशल FD स्कीमची डेडलाइन वाढवली, वाचा सविस्तर 5. स्माॉल सेव्हिंग स्कीम्सच्या व्याजदरात बदल- केंद्र सरकार 30 जून रोजी स्मॉल सेव्हिंग स्कीमच्या व्याजदरात कपात करू शकतं. सरकारकडून प्रत्येक तिमाहीला छोट्या बचत योजनांसाठीच्या व्याजदरात बदल केला जातो. आधीच्या तिमाहीमध्ये व्याजदर स्थिर ठेवण्यात आले होते, मात्र यावेळी व्याजदर कमी होण्याची शक्यता अधिक आहे. 6. यूनियन बँक करणार हा बदल- आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झालं आहे. अशावेळी यूनियन बँकेने दोन्ही बँकांच्या ग्राहकांना नवीन चेकबुक घेण्यास सांगितलं आहे, तुमचं आधीच चेकबुक आता अवैध असेल. शिवाय या दोन्ही बँकांचा आयएफएससी कोड देखील बदलला आहे. 7. भरा इन्कम टॅक्स रिटर्न-  तुम्ही आतापर्यंत Income Tax रिटर्न भरू शकला नसाल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करा. इन्कम टॅक्स नियमांच्या मते तुम्ही जर 30 जूनपर्यंत रिटर्न भरला नाहीत तर 1 जुलैपासून तुम्हाला दुप्पट टीडीएस भरावा लागेल. या नियमामुळे आयटीआर फाइल करण्यासाठी दुसऱ्यांदा संधी दिली आहे. आयटीआर फाइल करण्याची तारीख 31 जुलै असते पण ती वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. हे वाचा-EPFO: आता या कर्मचाऱ्यांची Take Home सॅलरी वाढणार, वाचा कुणाला मिळेल फायदा? 8. Axis बँकेच्या ग्राहकांसाठी असतील हे बदल- देशातील खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या अॅक्सिस बँकेने एसएमएस अलर्ट शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दर महिन्याला निश्चित 5 रुपये शुल्क घेण्याऐवजी बँक आता प्रत्येक एसएमएस अलर्ट (Axis Bank SMS Alert) साठी 25 पैसे (महिन्यातून जास्तीत जास्त 25 रुपये) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रमोशनल टेक्स्ट किंवा ओटीपी मेसेजसाठी हे शुल्क लागू असणार नाही. 9. LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल- दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होतो. 1 जुलै रोजी देखील गॅसच्या किंमती बदलू शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: