• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी उतरले सोन्याचे दर, चांदीचीही स्वस्त; इथे तपासा आजचे दर

Gold Price Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी उतरले सोन्याचे दर, चांदीचीही स्वस्त; इथे तपासा आजचे दर

Gold Silver Price, 29 June 2021: मंगळवारी सोन्याचांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळते आहे. तज्ज्ञांच्या मते डॉलर (Dollar) मध्ये आलेली मजबुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत झालेली घसरण यामुळे देशांतर्गत बाजारात दर उतरले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 29 जून: आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरीमुळे भारतातील सराफा बाजारात 29 जून रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) उतरले आहेत. तर चांदीच्या दरातही  (Silver Price Today) आज घसरण झाली आहे. आधीच्या व्यवहाराच्या सत्रात दिल्लीमध्ये सोन्याचे दर 46,256 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते, तक चांदीचे दर बाजार बंद होताना 68,148 रुपये प्रति किलोग्रॅम होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली तर चांदीच्या दरात बदल झालेला नाही. सोन्याचे नवे भाव (Gold Price, 29 June 2021) दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे दर 89 रुपयांनी कमी झाले आहेत. या घसरणीनंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या प्रति तोळा सोन्याचे दर 46,167 रुपये झाले आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात (Gold Rates in International Market) सोन्याचे दर घसरून 1,774 डॉलर प्रति औंस झाले आहेत. हे वाचा-SIP मध्ये गुंतवणूक करणं ठरेल फायद्याचं; 5 वर्षात चौपट होतील पैसे, काय आहे योजना? चांदीचे नवे दर (Silver Price, 29 June 2021) चांदीचे दर देखील आज घसरले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी चांदीचे दर 222 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. यांनंतर चांदीचे दर 67,926 रुपये प्रति किलो झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. याठिकाणी चांदीचे दर 26.02 डॉलर प्रति औंस आहेत. हे वाचा-या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळू शकतो वाढीव DA! असं होईल कॅलक्यूलेशन का घसरले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities)चे सीनिअर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे सोन्यामध्ये व्यवहार कमी झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्चचे व्हीपी नवनीत दमानी यांच्या मते गेल्या काही सत्रांपासून डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे सोन्याच्या दरात चढउतार होत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: