• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर! स्पेशल FD स्कीमची डेडलाइन वाढवली, वाचा सविस्तर

ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर! स्पेशल FD स्कीमची डेडलाइन वाढवली, वाचा सविस्तर

Special FD Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर एफडी काढण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 जून: ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior citizens) आनंदाची बातमी आहे. आता त्यांना जास्त कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिटच्या स्पेशल एफडी स्कीमचा फायदा घेऊ शकतात. देशातील काही महत्त्वाच्या बँकांकडून स्पेशल FD स्कीम्स ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्या जात आहेत. याचा फायदा आता 30 सप्टेंबरपर्यंत घेता येणार आहे.   स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी (HDFC) बँक, आयसीआयसीआय बँक (ICICI) आणि बँक ऑफ बडोदाने (BoB) सीनिअर सिटीझन्ससाठी या स्कीम सुरू केल्या आहेत. 30 जून रोजी संपणारी डेडलाइन वाढवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी स्कीम कोरोना काळात (Coronavirus Pandemic) अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदर कमी केला होता. दरम्यान काही बँका एफडीवर चांगलं व्याज देतात ज्यातून चांगला नफा मिळवता येतो. मे 2020 मध्ये, कमी होणाऱ्या व्याजदराच्या काळात काळातही काही बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खास एफडी स्कीम सुरू केल्या होत्या. पाच वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी SBI, HDFC बँक, ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदाने सीनिअर सिटीझन्ससाठी या स्कीम सुरू केल्या आहेत. हे वाचा-या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळू शकतो वाढीव DA! असं होईल कॅलक्यूलेशन इतर लोकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना या स्कीममध्ये अधिक व्याज मिळते आहे. या स्कीमसाठीची तारीख आता 30 सप्टेंबर 2021 करण्यात आली आहे. याआधी ही तारीख 31 डिसेंबर 2020, 31 मार्च 2021 आणि त्यानंतर 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती. दरम्यान आता सप्टेंबरपर्यंत वाढवलेली तारीख आणखी पुढे वाढवली जाईल अशी अपेक्षा कमी आहे, त्यामुळे आताच या योजनेचा लाभ घेण्यात यावा असा सल्ला देण्यात येत आहे. काय आहेत योजना? SBI WECARE- एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी गेल्यावर्षी मे महिन्यात एसबीआय वीकेअर ही टर्म डिपॉझिट स्कीम घोषित केली होती. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी 0.80 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. सध्या सामान्यांसाठी पाच ते 10 वर्षांसाठी 5.40 टक्के व्याज मिळते आहे, मात्र या स्कीमअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांसाठी 6.20 टक्के दराने व्याज मिळेल. हे व्याज 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिटवर लागू होते. हे नवे दर 8 जानेवारी 2021 पासून लागू आहेत. HDFC बँक सीनिअर सिटीझन केअर एफडी- एचडीएफसी बँक सीनिअर सिटीझन्ससाठी सीनिअर केअर एफडी (HDFC Senior Citizen Care FD) नावाने योजना सुरू केली आहे. या एफडीवर बँक 0.25 टक्के अतिरिक्त प्रीमियम ऑफर करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना आधीपासून 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळते त्याशिवाय अधिक 0.25 टक्के व्याज मिळेल. म्हणून एकूण अतिरिक्त 0.75 टक्के दराने व्याज मिळेल. ही स्कीम पाच वर्ष ते दहा वर्षासाठी आहे. एचडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्के दराने व्याज मिळते. हे दर 21 मे 2021 पासून लागू आहेत. हे वाचा-EPFO: आता या कर्मचाऱ्यांची Take Home सॅलरी वाढणार, वाचा कुणाला मिळेल फायदा? बँक ऑफ बडोदा- या बँकेने देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास स्कीम आणली आहे. पाच वर्षांपेक्षा जास्त ते दहा वर्षांसाठी असणाऱ्या एफडीवर BOB ज्येष्ठ नागरिकांना एक टक्का अधिक व्याज देते आहे. या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 6.25 या दराने व्याज दिले जात आहे. ICICI बँक गोल्डन इयर्स एफडी स्कीम- या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त मिळणाऱ्या 0.50 टक्के व्याजाव्यतिरिक्त आणखी 0.30 टक्के व्याज मिळेल. अर्थात सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.80 टक्के व्याज मिळेल. ही योजना पाच वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेवर लागू होईल
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: