• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • 30 जूनपूर्वी पूर्ण करा ही महत्त्वाची 5 कामं, अन्यथा बसेल मोठा आर्थिक फटका

30 जूनपूर्वी पूर्ण करा ही महत्त्वाची 5 कामं, अन्यथा बसेल मोठा आर्थिक फटका

तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. इन्कम टॅक्स (Income TAX), आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंकिंग (Adhaar Pan Linking) आणि बँकिंग संबंधित ही कामं 30 जून 2021 पूर्वी पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 12 जून: तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. इन्कम टॅक्स  (Income TAX), आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंकिंग (Adhaar Pan Linking) आणि बँकिंग संबंधित ही कामं 30 जून 2021 पूर्वी पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो किंवा दंड भरावा लागू शकतो. शिवाय बँकिंग व्यवहारातही समस्या येऊ शकतात, कदाचित तुमचं खातं बंद होण्याची परिस्थिती देखील उद्भवू शकते. वाचा कोणत्या गोष्टी 30 जूनपर्यंत पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. Adhaar-PAN लिंक जर तुम्ही आतापर्यंत तुमचं पॅन कार्ड (Pan Card) तुमच्या आधार क्रमांकाशी (Aadhar Card Number) लिंक केलं नसेल तर आजच हे काम पूर्ण करा. हे काम पूर्ण करण्यासाठीची डेडलाइन 30 जून आहे. इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) Adhaar-PAN लिंक करण्याची तारीख 30 जूनपर्यंत वाढवली होती. यानंतर ज्यांचे पॅन आधारशी लिंक नसेल त्यांना 1000 रुपये दंड द्यावा लागेल, शिवाय तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय (Deactivate) होईल. तुम्ही SBI ग्राहक असाल तर 30 जूनआधी पॅन कार्ड आधार लिंक केले नाही तर बँक 1000 रुपये दंड तर घेईलच पण त्याचबरोबर बँकेमधून मिळणाऱ्या सेवाही बंद होतील हे वाचा-दिलासा! ESICची महत्त्वाची स्कीम, कोविडमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळेल पगार द्यावा लागू शकतो दुप्पट टीडीएस करदात्यांसाठी (Taxpayers) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 1 जुलैपासून काही टॅक्सपेयर्सना अधिक टीडीएसचे भरावा लागू शकतो. आयकर विभागाने (IT department) आयटीआर न भरणाऱ्यांसाठी नियम अत्यंत कठोर केले आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 चा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाइल करण्याची अंतिम तारीख 31 जुलैवरून 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नवीन नियमांच्या मते ज्या लोकांनी आयटीआर फाइल केला नाही आहे त्यांच्यावर टॅक्स कलेक्शन अॅट सोअर्स (TCS) देखील जास्त लागेल. नवीन नियमांनुसार 1 जुलै 2021 पासून पीनल TDS आणि TCS दर 10-20 टक्के होईल जो साधारणत: 5-10 टक्के असतो. PM किसानच्या रकमेसाठी करा नोंदणी कोरोना काळात पीएम शेतकरी सन्मान निधीची (PM Kisan Samman Nidhi Yojana) 2000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मोदी सरकारकडून पाठवली आहे. हा आठवा हप्ता आहे. मात्र अजूनही असे काही शेतकरी आहेत ज्यांनी याबाबत नोंदणी केलेली नाही. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. तुम्ही 30 जूनपूर्वी रजिस्ट्रेशन केल्यास आठवा आणि नववा असे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील, अर्थात तुमच्या खात्यात 4000 रुपये पाठवले जातील. हे वाचा-आता मिळणार नाही Loan Moratorium चा लाभ, सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका या बँकेच्या ग्राहकांनी 30 जूनपूर्वी जाणून घ्या तुमचा IFSC कोड सिंडिकेट बँकेचे एक एप्रिल 2020 पासून कॅनरा बँकेत (Canara Bank) विलिनीकरण झाले आहे त्यामुळे या बँकेचे IFSC कोड 1 जुलैपासून बदलणार आहेत. अशावेळी सिंडिकेट बँकेचे सध्याचे आयएफएससी कोड 30 जून 2021 पर्यंत वैध असणार आहेत. 1 जुलैपासून बँकेचे नवीन IFSC कोड लागू होणार आहेत. सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना आता जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन नवीन IFSC कोड मिळवावा लागेल. SBI, HDFC सह अनेक बँका बदलत आहेत नियम या कोरोना काळातही काही बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खास एफडी स्कीम सुरू केल्या आहेत मात्र हा एफडी स्कीम 30 जून रोजी संपत आहेत. SBI, HDFC बँक, ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदाने सीनिअर सिटीझन्ससाठी या स्कीम सुरू केल्या आहेत. इतर लोकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना या स्कीममध्ये अधिक व्याज मिळते आहे. SBI WECARE, HDFC बँक सीनिअर सिटीझन केअर एफडी, ICICI बँक गोल्डन इयर्स एफडी स्कीम इ. अशी या स्कीम्सची नावं आहे. बँक ऑफ बडोदा देखील अधिक व्याजाने एफडी देत आहे. त्यामुळे 30 जूनपूर्वी जर ही एफडी काढली तरच तुम्हाला याचा लाभ मिळेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: