जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कोरोना काळात दिलासा! ESICची महत्त्वाची स्कीम, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दरमहा मिळेल पगार

कोरोना काळात दिलासा! ESICची महत्त्वाची स्कीम, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दरमहा मिळेल पगार

कमी पैशात जास्त फायदा देणारा LIC चा प्लॅन

कमी पैशात जास्त फायदा देणारा LIC चा प्लॅन

कोरोनाच्या या कठीण परिस्थितीमध्ये (Corornavirus Pandemic) कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने देखील अनेकांना दिलासा देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

प्रिया गौतम, नवी दिल्ली, 12 जून: कोरोनाच्या या कठीण परिस्थितीमध्ये (Corornavirus Pandemic) कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने देखील अनेकांना दिलासा देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी ESIC ने अनेक योजनांच्या माध्यमातून रोजगारापासून वंचित असणाऱ्यांना आर्थिक दिलासा दिला होता, आता आणखी काही योजना ESIC कडून राबवण्यात येणार आहेत. एम्‍प्‍लॉयी स्‍टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडून कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. ज्याचा कोविडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मिळेल. ESIC कडून कोविड-19 रिलीफ स्‍कीम (Covid-19 Relief Scheme) सुरू केली जात आहे. तीन जूनपासून ही योजना लागू करण्यात आली असली तरी याबाबत पूर्ण तयारी झाल्यानंतर आता औपचारीक नोटिफिकेशन जारी करण्यात येत आहे. ESIC मध्ये इन्शुरन्स कमिश्‍नर, रेव्हेन्‍यू अँड बेनिफिट एम के शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोणत्याही विशिष्ट आजारासंदर्भात सुरू केलेली ही पहिली योजना असेल, ज्यामझ्ये कोरोनाच्या विळख्यात सापडून मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ मदत केली जाईल. हे वाचा- लवकरात लवकर आधार करा तुमच्या PF खात्याशी लिंक, मिळणार नाही 7 लाखांची ही सुविधा डॉ. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेची खास बाब अशी आहे की या योजनेचा लाभ घेणाऱ्याची पात्रता अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. जेणेकरून ESIC मध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्याचा जर कोविडमुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाल सहज याचा लाभ घेता येईल. ESIC कोविड-19 रिलीफ स्‍कीममध्ये मिळेल हा लाभ डॉ. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्कीम अंतर्गत अर्ज करणाऱ्या कुटुंबीयांना मृत कर्मचाऱ्याचा पगार मिळेल. ESIC मध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्याचा जर कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील पत्नी, मुलं, अवलंबून असणारे आई-वडील किंवा बहीण-भाऊ यांना दरमहा कर्मचाऱ्याच्या अंतिम सॅलरीच्या 90 टक्के पेमेंट केलं जाईल. जर एखाद्या व्यक्तीचा पगार 15 हजार रुपये महिना असेल तर त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला 15 हजाराच्य 90 टक्के रक्कम दरमहा दिली जाईल. यामुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळेल. या कुटुंबीयांना मिळेल लाभ डॉ. एमके शर्मा यांचे म्हणणे आहे की या योजनेचा लाभ मृत कर्मचार्‍याच्या पत्नीला जोपर्यंत दुसरा विवाह करत नाही, तोपर्यंत त्यांना हा लाभ घेता येईल. जर कुटुंबात मुलगी असेल तर तिचे लग्न होईपर्यंत तिला पगार देण्यात येईल. त्याचबरोबर आयुष्यभर पेन्शनच्या रूपाने पालकांना या योजनेचा लाभ मिळेल. यासह मुलगा प्रौढ होईपर्यंत त्याला या योजनेचा लाभ मिळेल. हे वाचा- केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी खूशखबर! या दिवशी मिळेल DA चं गिफ्ट काय आहे योजनेची पात्रता या योजनेच्या पात्रतेमध्ये बरीच सवलत देण्यात आली आहे. कोणत्याही कंपनीत काम करताना वर्षभरात किमान 70 दिवसांसाठी ज्याने ज्याने ईएसआयसीमध्ये योगदान दिले आहे, अशा कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर या योजनेचा लाभ कुटुंबास मिळेल. याशिवाय संबंधित कर्मचारी कोविड होण्यापूर्वी तीन महिन्यांपर्यंत कोणत्याही कंपनीचा कर्मचारी असणे आवश्यक असते. या दरम्यान, जर त्याला कोरोना असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याचे कुटुंब या योजनेस पात्र ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात