मराठी बातम्या /बातम्या /मनी /Tata ची ग्राहकांना भेट! 'या' कारच्या किंमती केल्या कमी

Tata ची ग्राहकांना भेट! 'या' कारच्या किंमती केल्या कमी

कंपनीने पोर्टफोलिओमधील सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असलेली नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स एक्‍सएम ट्रिम लाँच केली. 16.49लाख रूपये किंमत असलेल्‍या या व्हेरिएंटमध्ये खास सुविधा आहेत...

कंपनीने पोर्टफोलिओमधील सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असलेली नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स एक्‍सएम ट्रिम लाँच केली. 16.49लाख रूपये किंमत असलेल्‍या या व्हेरिएंटमध्ये खास सुविधा आहेत...

कंपनीने पोर्टफोलिओमधील सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असलेली नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स एक्‍सएम ट्रिम लाँच केली. 16.49लाख रूपये किंमत असलेल्‍या या व्हेरिएंटमध्ये खास सुविधा आहेत...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 जानेवारी: टाटा मोटर्स सध्या देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी आहे. कंपनीची Nexon EV ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. आता टाटा मोटर्सने ग्राहकांना गिफ्ट देताना आपल्या इलेक्ट्रिक SUV Nexon EV च्या किमतीत कपात केली आहे. आता त्याची किंमत जवळपास पेट्रोल व्हर्जनच्या बरोबरीची झाली आता तुम्ही 14.49 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत Nexon EV खरेदी करू शकता.कंपनीची Nexon EV दोन व्हर्जनमध्ये Nexon EV Prime आणि Nexon EV Max मध्ये येते. Tata Nexon EV Prime ची सुरुवातीची किंमत आता 14.49 लाख रुपये झाली आहे आणि Nexon EV Max ची सुरुवातीची किंमत 16.49 लाख रुपये झाली आहे.  या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. यापूर्वी, मॅक्सचा एंट्री लेव्हल व्हेरिएंट 18.43 लाख रुपयांना येत होता.

तुमच्याकडे आहे 15 वर्ष जुनी कार? मग सरकारने आणला हा नियम वाचाच

Nexon EV Max ची ड्रायव्हिंग रेंज आता 453 किमी पर्यंत वाढवण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी 2023 पासून डीलरशिपवर सॉफ्टवेअर अपग्रेडद्वारे विद्यमान Nexon EV Max मालकांना रेंजमध्ये वाढ ऑफर केली जाईल.

Tata Motors repositions Nexon EV portfolio with aggressive pricing; enhances range of MAX variants to 453 kms@Tatamotorsev #Tata #TataNexonEV pic.twitter.com/VYNfPZ6aJG

ही आहेत कारची वैशिष्ट्ये

कंपनीने पोर्टफोलिओमधील सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असलेली नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स एक्‍सएम ट्रिम लाँच केली. 16.49लाख रूपये किंमत असलेल्‍या या व्हेरिएंटमध्ये इलेक्‍ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल, इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी®)सह आय-व्‍हीबीएसी, प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प्‍ससह एलईडी डीआरएल व एलईडी टेल लॅम्‍प्‍स, पुश बटन स्‍टार्ट, डिजिटल टीएफटी इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, झेडकनेक्‍ट कनेक्‍टेड कार टेकसह स्‍मार्टवॉच कनेक्‍टीव्‍हीटी आणि रिअर डिस्‍क ब्रेक्‍स अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत.

टॉप अँड ट्रिम नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स एक्‍सझेड+ लक्‍सची किंमत बदलून 18.49 लाख रूपये करण्‍यात आली आहे. एक्‍सएमच्‍या वैशिष्‍ट्यांव्‍यतिरिक्‍त या व्हेरिएंटमध्ये लेदरेट सीट्ससह वेंटिलेशन, वायरलेस स्‍मार्टफोन चार्जर, ऑटो डिमिंग आयआरव्‍हीएम, केबिन एअर प्‍युरिफायर, इलेक्ट्रिक सनरूफ, 8 स्‍पीकर्स असलेली हार्मनची 17.78 सेमी फ्लोटिंग इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम, 16-इंच अलॉई व्‍हील्‍स, हिल डिसेंट कंट्रोल, शार्कफिन अॅन्‍टेना इत्‍यादी वैशिष्‍ट्ये आहेत.

आता फोन बिलही वाढणार, टेलीकॉम कंपन्या टॅरिफ वाढवण्याच्या तयारीत! 

नेक्‍सॉन ईव्‍ही प्राइम एक्‍सएममध्‍ये प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प्‍स व एलईडी डीआरएल, पुश बटन स्‍टार्ट, डिजिटल टीएफटी इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, क्रूझ कंट्रोल, झेडकनेक्‍ट कनेक्‍टेड कार टेकसह स्‍मार्टवॉच कनेक्‍टीव्‍हीटी, हार्मन इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम, ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. या व्‍हेरिएण्‍टची किंमत आता 14.49 लाख रूपये करण्‍यात आली आहे. संपूर्ण नेक्‍सॉन ईव्‍ही लाइन-अपसाठी बुकिंग्‍जना त्‍वरित सुरूवात झाली आहे. नवीन व्‍हेरिएण्‍ट नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स एक्‍सएमच्‍या डिलिव्‍हरींना एप्रिल 2023 पासून सुरूवात होईल.

हाय व्‍होल्‍टेज अत्‍याधुनिक झिपट्रॉन तंत्रज्ञानाची शक्‍ती असलेल्‍या नेक्‍सॉन ईव्‍हीमध्‍ये आयपी६७ प्रमाणित वेदर-प्रूफ व धूळरोधक बॅटरी पॅक आहे, तसेच मोटर ८ वर्षे किंवा १६०,००० किमीच्‍या वॉरंटीसह येते, ज्‍यामधून परिपूर्ण मन:शांतीची खात्री मिळते. लाइन-अपमध्‍ये प्रमुख वैशिष्‍ट्यांचा समावेश करण्‍यात आला आहे, जसे डीसी फास्‍ट चार्जिंग, ४-लेव्‍हल मल्‍टी-मोड रिजेन, कस्‍टमायझेबल सिंगल पेडल ड्रायव्हिंग, प्रमाणित म्‍हणून झेडकनेक्‍ट कनेक्‍टेड कार टेक्‍नोलॉजी, क्रूझ कंट्रोल, फुली ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल, आय-टीपीएमएस, लेदरेट सीट्स आणि हार्मनची ब्रॅण्‍डेड इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम.

First published:

Tags: Business News, Tata group