मराठी बातम्या /बातम्या /मनी /आता फोन बिलही वाढणार, टेलीकॉम कंपन्या टॅरिफ वाढवण्याच्या तयारीत!

आता फोन बिलही वाढणार, टेलीकॉम कंपन्या टॅरिफ वाढवण्याच्या तयारीत!

नवीन वर्षात मोबाईल फोनचे टॅरिफ महाग होऊ शकतात. टेलिकॉम कंपन्या नवीन वर्षात मोबाइलच्या टॅरिफमध्ये10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा करू शकते.

नवीन वर्षात मोबाईल फोनचे टॅरिफ महाग होऊ शकतात. टेलिकॉम कंपन्या नवीन वर्षात मोबाइलच्या टॅरिफमध्ये10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा करू शकते.

नवीन वर्षात मोबाईल फोनचे टॅरिफ महाग होऊ शकतात. टेलिकॉम कंपन्या नवीन वर्षात मोबाइलच्या टॅरिफमध्ये10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा करू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 जानेवारी : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य आधीच त्रस्त आहेत. आता त्यांच्या टेंशनमध्ये पुन्हा वाढ होणार आहे. टेलीकॉम सर्व्हिसेसच्या महागाईमुळे लोकांच्या अडचणीही वाढू शकतात. सध्या टेलीकॉम कंपन्यांसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे प्रति ग्राहक प्रति महिना सरासरी कमाई (ARPU) आहे. भारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल हे देखील बऱ्याच दिवसांपासून ते वाढवण्याबिषयी बोलत आहेत. भारती एअरटेलच्या अलीकडील खराब कामगिरीचे सर्वात मोठे कारण म्हणजे टॅरिफमध्ये वाढ न होणे हे आहे. 2022 मध्ये कंपनी टॅरिफ वाढवेल अशी अपेक्षा शेअर बाजारालाही होती, मात्र कंपनीने अद्याप त्याची घोषणा केलेली नाही.

टॅरिफमध्ये का वाढ करणार टेलीकॉम कंपन्या

या क्षेत्रातील 3 पैकी 2 कंपन्या नफ्यासाठी संघर्ष करत आहेत. विशेषत: व्होडाफोन-आयडिया सध्या प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली आहे. 4 वर्षांच्या स्थगन कालावधीतही कंपनीच्या आर्थिक स्तरावर कामगिरीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. या कंपनीची अवस्था पाहता सरकारही थकबाकीचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्यास विलंब करत आहे.

पॅनकार्ड संदर्भात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा इशारा! त्वरित करा हे काम, अन्यथा... 

दुसरीकडे, रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलचे नेट डेट-टू-एबिटडा देखील तिप्पट आहे. आर्थिक स्तरावर संघर्ष सुरु असुनही कंपन्या 5G नेटवर्कमध्ये सतत गुंतवणूक करत आहेत. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल स्पेक्ट्रम लिलावानंतर देशभरात विविध भागात 5G सेवा सुरू करत आहेत. रिलायन्स जिओच्या संभाव्य आयपीओकडेही बाजाराची नजर आहे, परंतु त्याआधी कंपनीला EBITDA आणि FCF मध्ये सुधारणा करावी लागेल.

रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या दोन कंपन्यांच्या RMS (टेलिकॉम मार्केटमधील लीडरशिप पोझिशन) मध्येही मंदी दिसून आली आहे. Bharti Airtel आणि Vodafone Idea चा ARPU (दर महिन्याला प्रति ग्राहक सरासरी महसूल) सध्या 2016 च्या पातळीपेक्षा खाली आहे. तर गेल्या तीन वर्षांत या कंपन्यांनी दोनदा टॅरिफ वाढवला आहे.

आता ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार जास्त व्याज, 'ही' बँक देतेय विशेष सुविधा! 

ARPU 300 रुपयांपर्यंत असावा

भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी मनीकंट्रोलसोबत संवाद साधताना दावोसमध्ये सरकारचे कौतुक करत सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत आता अनुपालन वाढले आहे तसेच अंमलबजावणी करणे तितकेच सोपे झाले आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की, भारतीय टेलीकॉम इंडस्ट्रीला प्रायसिंग मॅकेनिज्मची ताकद मिळू शकेल. यावेळी ते म्हणाले, 'सर्वांना माहित आहे की, आपल्याला दरमहा 300 रुपये ARPU असणे आवश्यक आहे, जे अजूनही खूप स्वस्त असेल. भारताला योग्य प्रायसिंग मॅकेनिज्मची आवश्यकता आहे. मला आशा आहे की आपण तिथे पोहोचू.'

टॅरिफ न वाढवण्यामागे तर्क कोणता?

या महागाईच्या युगात सर्वसामान्यांची खर्च करण्याची क्षमता कमी झाली आहे. अशा स्थितीत टॅरिफ दरवाढीचा पूर्ण लाभ मिळण्याची शक्यता नाही. विशेषत: रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल पुढील 18 महिन्यांसाठी डेटा क्षमता वाढवण्याच्या योजनांवर काम करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Business, Mobile, Telecom, Telecom companies, Telecom service