जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Share Market सुरू होण्याआधी आजच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लीकवर

Share Market सुरू होण्याआधी आजच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लीकवर

Share Market सुरू होण्याआधी आजच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लीकवर

Share Market मध्ये ओपनिंगपेक्षा आज क्लोजिंगला का महत्त्व? जाणून घ्या कारण

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : शेअर बाजार आणि एकूणच गेल्या काही दिवसांच्या मार्केटमधील घडामोडींवर आजचा दिवस अगदी महत्त्वाचा असणार आहे. आज अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. आजच्या शेअर बाजारातील घडामोडींकडे विशेष लक्ष असणार आहे. आजच्या महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या आहेत आणि त्याचा परिणाम मार्केटवर आणि आपल्यावर कसा होणार आहे जाणून घेऊया. - आज विकली क्लोजिंक आहे. मंथली क्लोजिंग आणि Q6 क्लोजिंग देखील आहे. याकडे लक्ष असणार आहे. पुढच्या ६ महिन्यांच्या अनुषंगाने अनेक गोष्टी घडू शकतात. १ ऑक्टोबर पासून अनेक बदल देखील होणार आहेत. त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. Share Market मध्ये ओपनिंगपेक्षा आज क्लोजिंगला महत्त्व असणार आहे.

Good News : स्मॉल सेविंग स्कीमसाठी केंद्र सरकारने वाढवले व्याजदर

मार्केटमधील महत्त्वाचे ट्रिगर्स आज RBI मॉनेटरी पॉलिसी बाबात महत्त्वाच्या निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामध्ये आज महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी RBI आज ०.५ टक्के व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे EMI वाढण्याची शक्यता आहे. -डाओ ४५८ अंकांनी आपटला आहे. नॅस्डॅक ३ टक्क्यांनी कोसळला आहे. त्याचा परिणाम आज मार्केटमध्ये कसा होतो हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. अमेरिकेतील बाजारपेठेत मंदीचे संकेत अजूनही आहेत. - डॉलर इंडेक्स ११२ वरून खाली घसरला आहे. त्याचा शेअर मार्केटच्या ओपनिंग आणि क्लोजिंगवर कसा परिणाम होतो ते पाहावं लागणार आहे. याचा फायदा भारताला होण्याची शक्यता आहे.

News18लोकमत
News18लोकमत
OTT किंवा सिमकार्डसाठी खोटी ओळख दाखवली? मोठा दंड अन् तुरुंगात होऊ शकते रवानगी

- अदानी एन्टरप्राइजेस आज निफ्टीमध्ये एन्ट्री होणार आहे. तर श्री सीमेंट बाहेर गेलं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना याचा कसा फायदा आणि तोटा होतो ते देखील पाहाणं आज महत्त्वाचं राहिल. याचा बाजारपेठेवरील परिणाम मूड कसा बदलेल याकडे लक्ष असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात