जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Good News : स्मॉल सेविंग स्कीमसाठी केंद्र सरकारने वाढवले व्याजदर

Good News : स्मॉल सेविंग स्कीमसाठी केंद्र सरकारने वाढवले व्याजदर

Good News : स्मॉल सेविंग स्कीमसाठी केंद्र सरकारने वाढवले व्याजदर

केंद्र सरकारने गुरुवार तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) स्मॉल सेविंग स्कीमसाठी नव्या व्याज दरांची घोषणा केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

न****वी दिल्ली, 29 सप्टेंबर : केंद्र सरकारने गुरुवार तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) स्मॉल सेविंग स्कीमसाठी नव्या व्याज दरांची घोषणा केली आहे. यंदा सरकारने 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरील व्याज दरात 30 बेसिस पॉइंटपर्यंत वाढ केली आहे. पोस्टात 3 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉजिटसाठी सध्या 5.5 टक्के 5.8 पर्यंत नेण्यात आले आहेत. वरिष्ठ नागरिक बचत योजनासाठी व्याज दर 7.4% ने वाढून 7.6%, शेतकरी विकास पत्रासाठी 6.9% ने वाढवून 7 टक्के आणि दोन ते तीन वर्षांच्या फिक्स्ड डिपॉजिटसाठीही व्याज दरात वाढ करण्यात आली आहे.  शेतकरी विकास पत्राबाबतच्या टेन्यूअरमध्येही बदल करण्यात आला आहे. आता 7 टक्क्यांपर्यंत व्याज दर असलेले KVP ची मॅच्युरिटीही वाढवून 123 महिन्यांपर्यंत करण्यात आली आहे. तर 6.9 टक्क्यांची केवीपीचा अवधी 124 महिने होता. ‘या’ FD मध्ये गुंतवणूक करा आणि 46,800 रुपयांपर्यंत TAX वाचवा NCS आणि PPF मध्ये बदल नाही… सेविंग डिपॉजिट, 1 वर्षे, 5 वर्षांची एफडी, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NCS), सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निधीवर (PPF) सध्या तिमाहीसाठी समाज व्याज दर मिळतील. नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेटवर व्याज दर सध्या 6.8 टक्के आहे. पब्लिक प्रोविडेंट फंडावर (PPF) 7.10 टक्के व्याज दर आहे. पोस्टाच्या ‘या’ योजनेत दररोज भरा 95 रुपये; मुदतीनंतर मिळतील 14 लाखांसह अनेक फायदे आतापर्यंत अशी घोषणा रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीनंतर केली जात होती. यंदा मात्र सरकारने एक दिवस आधी ही घोषणा केली आहे. काल (28 सप्टेंबर) सुरु झालेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एमपीसी बैठक उद्या (शुक्रवारी) संपणार आहे. उद्या पॉलिसी दरांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते. कर्जाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता बहुतांश तज्ज्ञ वर्तवत आहेत. असे झाल्यास कर्ज महाग होईल आणि ईएमआय वाढेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात