नवी दिल्ली, 10 जानेवारी : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. एसबीआयने (SBI) काही निवडक मॅच्युरिटी पीरियडवर फिक्स्ड डिपॉजिटवरील (Fixed Deposit) व्याज दरांत वाढ केली आहे. बँकेने एक ते दोन वर्षांपेक्षा कमी एफडीच्या व्याजावर (FDs interest rates) 10 बेसिस पॉईंटपर्यंत वाढ केली आहे. नवीन दर 8 जानेवारी 2021 पासून लागू झाले आहेत. > 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 2.9 टक्क्यांनी व्याज मिळेल. » 46 दिवस ते 179 दिवसांपर्यंतच्या एफडीवर 3.9 टक्के दराने व्याज मिळेल. » 180 दिवस ते 1 वर्षाहून कमीच्या एफडीवर 4.4 टक्क्यांच्या दराने व्याज मिळेल. » 211 दिवस ते 1 वर्षाहून कमी असलेल्या एफडीवर 4.4 टक्के दर व्याज मिळेल. » 1 वर्ष ते 2 वर्षाहून कमीच्या एफडीवर 5 टक्के दराने व्याज दिलं जाईल. » 2 ते 3 वर्षांहून कमी असलेल्या एफडीवर 5.1 टक्क्यांच्या दराने व्याज असेल. » 3 ते 5 वर्षापर्यंतच्या एफडीवर 5.3 टक्के दराने व्याज मिळेल. » 5 वर्ष आणि 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.4 टक्के दराने व्याज दिलं जाईल.
(वाचा - मोदी सरकार देतेयं, स्वस्त दरात सोने खरेदीची संधी; जाणून घ्या किंमत )
सिनियर सिटिजन्सला किती मिळेल व्याज - सिनियर सिटिजन्सला सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 50 बेसिस पॉईंट अधिक व्याज मिळतं. बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सिनियर सिटिजन्सला 7 दिवस ते 10 वर्षापर्यंत मॅच्योर होणाऱ्या एफडीवर जवळपास 3.4 टक्के ते 6.2 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.
(वाचा - SBIने स्वस्त केलं गृह कर्ज, स्वप्नातलं घर घेण्याची संधी; प्रोसेसिंग फी देखील माफ )
>> 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.4 टक्के व्याज » 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 4.4 टक्के » 180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर 4.9 टक्के व्याज » 211 दिवस ते 1 वर्षाहून कमीच्या एफडीवर 4.9 टक्के व्याज » 1 ते 2 वर्षापर्यंतच्या एफडीवर 5.5 टक्के » 2 ते 3 वर्षापेक्षा कमी एफडीवर 5.6 टक्के » 3 ते 5 वर्ष कमीच्या एफडीवर 5.8 टक्के » 5 वर्ष आणि10 वर्षापर्यंतच्या एफडीवर 6.2 टक्के व्याज मिळेल.