नवी दिल्ली, 10 जानेवारी : मोदी सरकार पुन्हा एकदा स्वस्त दरात सोनं खरेदी करण्याची संधी देत आहे. जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असल्यास, 11 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यत चांगली संधी आहे. सॉवरेन गोल्ड बाँडसाठी (Sovereign Gold Bond) सोन्याची किंमत 5,104 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने शुक्रवारी ही माहिती दिली. बाँडचं मूल्य सब्सक्रिप्शन पीरियड सुरू होण्याआधी, आठवड्याच्या शेवटच्या तीन सत्रात 999 शुद्धतेच्या सोन्याचं सरासरी बंद मूल्यवर (Closing Rates) आधारित असतं. हे मूल्य इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड प्रकाशित करतं. 19 जानेवारी सेटलमेंट डेट - सरकारने Gold Bond 2020 21 (सीरीज X) ची घोषणा केली आहे. या गोल्ड बाँडमध्ये 11 जानेवारी, 2021 ते 15 जानेवारी, 2021 पर्यंत इनवेस्टमेंट करता येऊ शकते. सेटलमेंट डेट 19 जानेवारी आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2020 21 (सीरीज X) मध्ये सोन्याची किंमत 5,104 रुपये प्रति ग्रॅम ठरवण्यात आली आहे. RBI ने 8 जानेवारी 2021 ला सोन्याच्या किंमतीची घोषणा केली.
(वाचा - Whatsapp ला नवा पर्याय; भारतात गुगल प्ले स्टोरवर नंबर 1 फ्री App ठरलं Signal )
या ग्राहकांना 50 रुपये प्रति ग्रॅम सूट - जे गुंतवणूकदार ऑनलाईन अर्ज करतील आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करतील, त्यांना ठरवलेल्या किंमतीवर प्रति ग्रॅम 50 रुपये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँडचं मूल्य 5,054 रुपये प्रति ग्रॅम असेल. गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करुन टॅक्समध्येही सूट मिळवता येते.
(वाचा - चुकूनही Google वर Search करू नका ‘या’ 10 गोष्टी; होऊ शकतं नुकसान )
या योजनेंतर्गत वैयक्तिक गुंतवणूकदार आणि हिंदू अविभाजित कुटुंब एका आर्थिक वर्षात कमीत कमी एक ग्रॅम आणि अधिकाधिक चार किलोग्रॅम गोल्डसाठी गुंतवणूक करू शकतात. ट्रस्टसारख्या इतर संस्था वर्षाला 20 किलोग्रॅम सोन्यात गुंतवणूक करू शकतात. गोल्ड बाँडची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉरर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि मान्यता प्राप्त शेअर बाजारद्वारे केली जाईल. Sovereign Gold Bond साठी अर्ज करताना पॅन कार्ड आवश्यक आहे.