मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI ने स्वस्त केलं गृह कर्ज, स्वप्नातलं घर घेण्याची संधी; प्रोसेसिंग फी देखील पूर्णपणे माफ

SBI ने स्वस्त केलं गृह कर्ज, स्वप्नातलं घर घेण्याची संधी; प्रोसेसिंग फी देखील पूर्णपणे माफ

SBI ने शुक्रवारी गृहकर्जावरील व्याज दर 0.30 टक्क्यांनी कमी करण्याची आणि प्रोसेसिंग फी पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी  दिल्ली, 08 जानेवारी: तुम्ही देखील घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर याहून चांगली संधी तुम्हाला मिळणार नाही. देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँकऑफ इंडिया (State Bank of India) कमी व्याज  दरात गृह कर्ज (Home Loan) उपलब्ध करून देत आहे. SBI ने शुक्रवारी गृहकर्जावरील व्याज दर 0.30 टक्क्यांनी कमी करण्याची आणि प्रोसेसिंग फी (Processing Fee) पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे. महिला कर्जदारांना मिळेल अतिरिक्त सूटबँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की गृह कर्जावरील नवीन व्याज दर सिबिल स्कोअरशी जोडले गेले आहेत आणि 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी 6.80 टक्के दराने सुरू झाले आहेत. तर 30 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे व्याज दर 6.95 टक्के आहे. बँकेने असे म्हटले आहे की, महिला कर्जदारांना गृहकर्जावरील व्याजावर 0.05 टक्के अतिरिक्त सूट देखील मिळेल. प्रोसेसिंग फीवर 100 टक्के सूट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बैंक के मुताबिक, ''घर खरेदीदारांना आकर्षक सूट देण्याच्या उद्देशाने देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणाऱ्या एसबीआयने गृहकर्जावर 30 बीपीएस (0.30 टक्के) ची सवलत आणि प्रक्रिया शुल्कात (Processing Fee) 100 टक्के सूट जाहीर केली आहे.' (हे वाचा-जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनल्यावर एलन मस्क यांची 'Strange' प्रतिक्रिया) YONO अॅपवरून केलेल्या अर्जावर 0.05% अतिरिक्त सवलत पाच कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी आठ महानगरांमध्ये  0.30 टक्क्यांपर्यंतच्या व्याज सवलत देण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. त्यांनी या निवेदनात असे म्हटले आहे की, म्हटले आहे की योनो अॅपद्वारे ग्राहक सहजपणे घरबसल्या गृहकर्जासाठी अर्ज करू शकतात आणि YONO वरून अर्ज करणाऱ्यांना 0.05 टक्के अतिरिक्त व्याज सवलत मिळेल.
First published:

Tags: Home Loan, Sbi home loan

पुढील बातम्या