नवी दिल्ली, 29 जून: महागाई भत्त्याची (
DA) वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (
Central Government) महत्वाची बातमी आहे. 26 जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये डीए संदर्भात कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. केंद्रीय कॅबिनेटकडून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, लवकरच देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी डीए देण्यात येईल. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (
7th Pay Commission) कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ केली जाऊ शकते. जाणून घ्या या महागाई भत्त्यासंदर्भातील महत्त्वाच्या बाबी..
52 लाखापेक्षा जास्त केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 62 लाखापेक्षा जास्त पेन्शनर्सना याचा लाभ मिळेल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होईल. शिवाय पेन्शनर्सना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनामध्ये देखील मोठी वाढ होईल. सूत्रांच्या माहितीनुसार महागाई भत्ता लवकरच जारी केला जाऊ शकतो. जुलै महिन्यात सर्वांना वाढीव डीए मिळेल, अशी माहिती समोर येते आहे.
कशाप्रकारे होतं कॅलक्यूलेशन?
डीए कशाप्रकारे मोजला जातो किंवा याचं कॅलक्यूलेशन कसं होतं यावर बोलायचं झालं तर डीए प्रत्येकाच्या पगारानुसार ठरतो. आम्ही तुम्हाला याचा एक फॉर्म्युला सांगू इच्छितो.
-केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता= {(गेल्या 12 महिन्याच्या ऑल इंडिया कंज्यूमर प्राइस इंडेक्स (AICPI) ची सरासरी (बेस ईयर 2001=100) -115.76)/115.76}×100.
-PSU (पब्लिक सेक्टर यूनिट्स) मध्ये काम करणाऱ्यांसाठी महागाई भत्त्याचं कॅलक्यूलेशन अशाप्रकारे होतं-
महागाई भत्त्याची टक्केवारी= {(गेल्या 3 महिन्यांची ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी (बेस ईयर 2001=100)-126.33)/126.33} x 100.
हे वाचा-SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवसात होणार मोठा बदल
तीन हप्ते आहेत पेंडिंग
नॅशनल काउन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (JCM) ही एक केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची एक संस्था आहे. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना डीएचे तीन हप्ते मिळणं बाकी आहे. कोरोनामुळे सरकारने ही डीएची रक्कम फ्रीज केली होती. शिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांना डीआरचे हप्ते देखील दिले नव्हते. कर्मचारी आणि पेन्शनर्सचे 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 चे डीए आणि डीआर थकित आहेत.
26 जून रोजी या मुद्द्यांवर झाली चर्चा
1. जे केंद्रीय कर्मचारी सीजीएचएस च्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स स्कीम लागू व्हायला हवी
2. ज्या शहरात सीजीएचएस सुविधा नाही आहे, त्याठिकाणी पेन्शनर्सच्या झालेल्या खर्चासाठी रिएम्बर्समेंट मिळायला हवी
3. रुग्णालयांच्या रिएम्बर्समेंटची तरतूद
4. कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला भत्ता मिळायला हवा
5. कर्मचाऱ्यांना मेडिकल अॅडव्हान्स मिळायला हवा
6. 2004 नंतर आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जनरल प्रोव्हिडेंट फंडची सुविधा मिळायला हवी
7. ग्रुप इन्शुरन्स स्कीममध्ये रिव्हिजन व्हायला हवी
हे वाचा-छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फटका, कमी होणार व्याजदर?
किती वाढू शकतो डीए?
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या 17 टक्के डीए मिळतो. अर्थ मंत्रालयाने जून 2021 पर्यंत 50 लाखापेक्षा जास्त केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 61 लाख पेन्शनधारकांच्या डीए आणि डीआरची वाढ थांबवली आहे. जानेवारी 2020 मध्ये डीएमध्ये 4 टक्के वाढ झाली होती. त्यानंतर जून 2020 मध्ये महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढला होता. यानंतक जानेवारीमध्ये डीए 4 टक्के वाढला आहे. आता महागाई भत्ता 28 टक्क्यांच्या दरावर पोहोचला आहे. याचा फायदा या सर्व कर्मचारी आणि पेन्शनर्सना होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.