जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Share Market : ग्लोबल मार्केटमधील स्थितीमुळे वाढलं टेन्शन, भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम

Share Market : ग्लोबल मार्केटमधील स्थितीमुळे वाढलं टेन्शन, भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम

Share Market : ग्लोबल मार्केटमधील स्थितीमुळे वाढलं टेन्शन, भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम

आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अजूनही कोसळलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ही स्थिती गेल्या ६ ते ७ दिवसांपासून कायम आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सलग सातव्या दिवशी शेअर बाजार कोसळला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अजूनही कोसळलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ही स्थिती गेल्या ६ ते ७ दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे आशियातील शेअर बाजारही कोसळला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर आर्थिक मंदीचे संकेत आहेत. त्यामुळे भारतातील शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे. आजही जागतिक संकेतांमुळे बाजारातील तणाव वाढला आहे. SGX निफ्टी सुमारे एक चतुर्थांश ते दोनशे अंकांनी खाली दिसत आहे. आशियाई बाजार देखील 2% पर्यंत घसरले आहेत. काल DOW आणि S&P 500 नव्या निचांकावर पोहोचून बंद झालं. चिनी चलन 14 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे.

हे 5 शेअर्स तुमच्याकडे असतील तर लागेल लॉटरी, मिळू शकतो 58% बंपर रिटर्न

 आरबीआय एमपीसीची तीन दिवसीय बैठक आजपासून सुरू होत आहे. यानंतर शुक्रवारी पतधोरण जाहीर होणार आहे. यामध्ये दीड टक्का व्याजदरवाढ शक्य असल्याचे बहुतांश लोकांचे मत आहे.

जाहिरात
‘या’ FD मध्ये गुंतवणूक करा आणि 46,800 रुपयांपर्यंत TAX वाचवा

सगळ्या सेक्टरमध्ये बाजारपेठेत दबाव असल्याचं दिसत आहे. मेटलमध्ये दीड ते दोन टक्क्यांनी दबाव आहे. तर बँकिंग सेक्टरमध्ये देखील दबाव आहे. मिड-स्मॉल कॅपमध्ये कमजोरी पाहायला मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात