जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Stock Market Updates : शेअर बाजार कोसळण्याची 5 मोठी कारण

Stock Market Updates : शेअर बाजार कोसळण्याची 5 मोठी कारण

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी US फेडर बँकेनं व्याजदर वाढवला. ०.७५ टक्क्यांनी हा रेट वाढवल्याने त्याचे मोठे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर पाहायला मिळाले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी US फेडर बँकेनं व्याजदर वाढवला. ०.७५ टक्क्यांनी हा रेट वाढवल्याने त्याचे मोठे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर पाहायला मिळाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या दोन महिन्यात पुन्हा व्याजदर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सध्या मोठी खळबळ उडाली आहे. US शेअर बाजार खाली घसरला आणि त्याचा मोठा फटका भारतालाही बसला आहे. यामागची नेमकी कारणं काय आहेत जाणून घेऊया. शेअर बाजार कोसळण्याची ५ मोठी कारण भारतातही शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या अंकांनी कोसळली आहे. यामागे ५ कारण असल्याचं सांगितलं जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य निचांकावर पोहोचलं आहे. एका डॉलरसाठी ८१.५४ रुपये मोजावे लागणार आहे. डॉलर इंडेक्ट उच्चस्तरावर पोहोतचल्याने सोनं आणि जगभरातील करन्सीवर दबाव निर्माण झाला आहे. RBI ची शुक्रवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. यावेळी RBI महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी ०.५० टक्के रेपो रेटमध्ये वाढवणार आहे. त्यामुळे EMI वाढण्याची शक्यता आहे. बँकांवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. IFrame -

News18लोकमत
News18लोकमत

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा परिणाम चीनमधील शेअर बाजारावर झाला आहे. कमोडिटी किंमतीवर वेगानं परिणाम होताना दिसत आहे. तर मेटल शेअर्सच्या किंमतीही आपटल्या आहेत. ५ सत्रामध्ये खूप जास्त नुकसान झालं आहे. त्यामुळे गुंवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे. 5 दिवसात उडाली मार्केटकॅप कंपनी RIL -85, 000 HDFC Bk -45,000 SBI -28,000 ICICI Bank -26,000 HDFC -24,000 Power Grid -22,000 Adani Port-20,000 Axis Bank -18,000

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात