जाहिरात
मराठी बातम्या / मनी / हे 5 शेअर्स तुमच्याकडे असतील तर लागेल लॉटरी, मिळू शकतो 58% बंपर रिटर्न

हे 5 शेअर्स तुमच्याकडे असतील तर लागेल लॉटरी, मिळू शकतो 58% बंपर रिटर्न

हे 5 शेअर्स तुमच्याकडे असतील तर लागेल लॉटरी, मिळू शकतो 58% बंपर रिटर्न

या शेअरमधून गुंतवणूकदारांना मोठा परतावा परत मिळू शकतो अशी चर्चा सुरू आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : US फेड बँकेनं महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात वाढ केली. पुढच्या दोन महिन्यात पुन्हा एकदा व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह आशियातील मार्केटवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात शेअर बाजार कोसळलं आहे. डॉलर मजबूत झाला तर रुपयाने २० वर्षातील सगळे रेकॉर्ड मोडून निचांक गाठला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी भारतातील शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. बेंचमार्क निर्देशांक 1.8 टक्क्यांनी घसरला. बँकिंग, फायनान्स, मेटल, रियल्टी क्षेत्रातील शेअर्स जोरदार आपटले. दरम्यान, कॉरपोरेट डेवलपमेंट आणि आउटलुकच्या आधारावर, ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने 5 शेअर्स घेण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरमधून गुंतवणूकदारांना मोठा परतावा परत मिळू शकतो अशी चर्चा सुरू आहे. Gujarat Fluorochemicals- ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने प्रति शेअर टार्गेट प्राइस 4,270 रुपये जाऊ शकते. या शेअरचा आताचा भाव ३,५९१ रुपये आहे. 26 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 3,591 रुपये होती. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 679 रुपये किंवा पुढे जाऊन सुमारे 19 टक्के परतावा मिळू शकतो.

‘या’ FD मध्ये गुंतवणूक करा आणि 46,800 रुपयांपर्यंत TAX वाचवा

Jyothy Labs - हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. याची टार्गेट किंमत २२० रुपये आहे.२६ सप्टेंबर रोजी या शेअरची किंमत १७९ रुपये होते. यामध्ये ४१ रुपयांपर्यंत म्हणजे २३ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतो. Indusind Bank - सोमवारी या शेअरची किंमत १,१४९ रुपये होती. या स्टॉकमधून २७१ रुपये फायदा मिळू शकतो. २४ टक्के रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.

Business Ideas: नोकरीची चिंता सोडा! अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिन्याला होईल बंपर कमाई

Bandhan Bank- या स्टॉकमध्ये ५६ टक्के रिटर्न मिळू शकतो असं ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजचं म्हणणं आहे. या शेअरमध्ये १४६ रुपयांचा फायदा मिळू शकतो. याची सोमवारी किंमत २६२ रुपये होती. Greenpanel Industries- याचे भाव ४१९ रुपये होते. यामध्ये गुंतवणूकदारांना २४३ रुपयांचा मोठा फायदा होऊ शकतो असं सांगितलं जात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

(कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, इथे गुंतवणं जोखमीचं ठरू शकतं त्यामुळे अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात