मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'या' FD मध्ये गुंतवणूक करा आणि 46,800 रुपयांपर्यंत TAX वाचवा

'या' FD मध्ये गुंतवणूक करा आणि 46,800 रुपयांपर्यंत TAX वाचवा

या एफडीमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवून तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत आयकर कपातीचा दावा करू शकता.

या एफडीमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवून तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत आयकर कपातीचा दावा करू शकता.

या एफडीमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवून तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत आयकर कपातीचा दावा करू शकता.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : तुम्ही कोणतीही जोखीम न घेता खात्रीशीर रिटर्न शोधत असाल, तर तुम्ही टॅक्स सेव्हिंग एफडी (Fixed Deposit) मध्ये गुंतवणूक करू शकता. या एफडीमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवून तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत आयकर कपातीचा दावा करू शकता.

एवढचं काय, जर तुमचं एकूण वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला तुमची आयकर बचत 46,800 पर्यंत वाढवता येईल. मात्र, टॅक्स सेव्हिंग एफडीचा लॉक इन कालावधी 5 वर्षांचा आहे. याचा अर्थ तुम्ही त्यात गुंतवलेले पैसे 5 वर्षे काढू शकत नाही.

लाइव्ह मिंटमधील एका रिपोर्टनुसार, बँक बाजार डॉट कॉमचे सीईओ आदित्य शेट्टी यांच्या मते, ‘टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवलेल्या पैशांतून होणारं टॅक्स सेव्हिंग टॅक्सच्या श्रेणीनुसार बदलू शकते.

OMG! 'या' शेअरने 24 वर्षांमध्ये दिला तब्बल 3681 पट परतावा

30 टक्के आयकर श्रेणीत येणाऱ्या व्यक्ती 46,800 रुपयांच्या टॅक्स सेव्हिंगचा दावा करू शकतात. त्याचप्रमाणे, जर 20 टक्के टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीने टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये 150,000 रुपये गुंतवले तर तो वार्षिक 31,200 रुपये टॅक्स वाचवू शकतो. टॅक्स सेव्हिंग एफडीमध्येही चांगले व्याज मिळते. यावर प्रमुख बँका किती व्याज देत आहेत, ते पाहुयात.

इंडसइंड बँक: इंडसइंड बँक सध्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर वार्षिक 6.75 टक्के दराने व्याज देते. याशिवाय येस बँक देखील टॅक्स सेव्हिंग एफडीवर 6.75 टक्के दराने व्याज देते.

डीसीबी बँक: खासगी क्षेत्रातील बँक डीसीबी सुद्धा टॅक्स सेव्हिंग एफडीवर चांगले रिटर्न देत आहे. सध्या ही बँक एफडीवर वार्षिक 6.60 टक्के दराने व्याज देते.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राजधानीत सोनं महागलं! मुंबईतील दरात मात्र..

आरबीएल बँक: आरबीएल बँक ग्राहकांना टॅक्स सेव्हिंग एफडीवर 6.55 टक्के दराने व्याज देते. तसेच तुम्ही आयडीएफसी फस्ट बँकमध्ये टॅक्स सेव्हिंग एफडी केल्यास तुम्हाला 6.50 टक्के दराने व्याज मिळेल.

इंडियन ओव्हरसीज बँक: सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर ग्राहकांना वार्षिक 5.85 टक्के दराने व्याज देते.

कॅनरा बँक: कॅनरा बँक त्यांच्या ग्राहकांना टॅक्स सेव्हिंग एफडीवर 5.75 टक्के व्याजदर देते. याशिवाय, पंजाब नॅशनल बँक देखील टॅक्स सेव्हिंग एफडीवर वार्षिक 5.75 टक्के व्याज दर देते.

युनियन बँक: तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असणाऱ्या युनियन बँकेत टॅक्स सेव्हिंग एफडी केली असेल, तर तुम्हाला वार्षिक 5.75 टक्के दराने व्याज मिळेल. याशिवाय, स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना टॅक्स सेव्हिंग एफडीवर वार्षिक 5.65 टक्के दराने व्याज देते.

टॅक्स सेव्हिंग करण्यासाठी एफडी करणे हा एक चांगला पर्याय आहे. परंतु या एफडीमधील पैसे हे 5 वर्ष काढता येत नाही, हेही लक्षात असू द्या.

First published:

Tags: Income tax, Money, Personal finance, Tax benifits