नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) अकाऊंट असणाऱ्या ग्राहकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जर तुमचे बँक अकाउंट आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक केले नसेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे त्वरित तुमचे बँक अकाऊंट आधार कार्डशी लिंक करा.
एसबीआयने (SBI) ट्वीट करत ही माहिती दिली आहे. बँकेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा तुमच्या अकाऊंटमध्ये कोणत्याही प्रकारची सबसिडी येत असेल तर त्यासाठी तुमचं बँक अकाऊंट आधारकार्डशी लिंक करणं आवश्यक आहे.
We would like to inform our customers that Aadhaar Card seeding is mandatory for those desirous of receiving any benefit or subsidy from Govt. of India through Direct Benefit Transfer.#DirectBenefitTransfer#AadhaarCardpic.twitter.com/EICJUbBeVC
तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने तुमचं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करू शकता. एसबीआय अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम आणि बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही तुमचे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करू शकता.
बँकेत जाऊन अशा पद्धतीने करा आधार लिंक
जर तुम्ही नेट बँकिंगचा वापर करत नसाल तर तुम्हाला बँकेत जाऊन अकाउंट आधारकार्डशी लिंक करावं लागेल. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन आधार कार्डची फोटो कॉपी द्यावी लागेल. त्यासोबतच तुम्हाला पासबुक सोबत घेऊन जावं लागेल. बँकेत तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल. जेव्हा तुमचं अकाउंट आधारकार्डशी लिंक होईल तेव्हा तुम्हाला बँकेकडून एक एसएमएस पाठवून माहिती दिली जाईल. जर तुमचा आधार कार्ड आणि बँकेत दिलेला मोबाइल नंबर वेगळा असेल तर ही प्रक्रिया होणार नाही.
नेट बँकिंगद्वारे असं करा आधार लिंक
- तुम्हाला बँकेच्या bank.sbi वेबसाइटवर जावं लागेल किंवा www.sbi.co.in यावर जावं लागेल.
- याठिकाणी होम पेजवर Link your AADHAAR Number with your bank यावर क्लिक करा.
- आपला आधार क्रमांक अकाऊंटशी जोडण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नियमांना फॉलो करा.
- आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर मॅपिंगची स्थिती दिली जाईल.