नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी: सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold Price) गेले काही दिवस तेजी पाहायला मिळते आहे. पण तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल, तर हा सर्वात चांगला कालावधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर 8 महिन्यातील सर्वात कमी स्तरावर आहेत. त्यामुळे तुम्ही सोने खरेदीचा विचार करू शकता. गुरुवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi commodity exchnage)वर सोन्याची एप्रिलची वायदे किंमत 203 रुपयांनी वधारली आहे. यानंतर सोन्याचे भाव 46,443 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत आहेत.
चांदीची मार्चची वायदे किंमत देखील (Silver Rates) 159.00 रुपयांनी वाढून 69,390.00 रुपये प्रति किलो झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचले होते. त्यावेळी सोन्याने ऑल टाइम हायचा रेकॉर्ड बनवला होता. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या दरात 9800 रुपयांची घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) देखील सोन्याच्या किंमतमीमध्ये तेजी पाहायला मिळते आहे. अमेरिकेत सोन्याचे दर 7.22 डॉलरने वाढून 1,783.81 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तर चांदीचे दर 0.06 डॉलर घसरणीनंतर 27.31 डॉलरच्या स्तरावर आहेत.
(हे वाचा-या बँकेच्या गोंधळामुळे कॉस्मेटिक कंपनी मालामाल, ट्रान्सफर केले 3,650 कोटी रुपये!)
दिल्लीमध्ये 18 फेब्रुवारी रोजी सोन्याचांदीचे भाव (Gold and Silver Prices on 18th February 2021)
>> 22 कॅरेट गोल्ड - 45890 रुपये
>> 24 कॅरेट गोल्ड - 50060 रुपये
>> सिल्व्हर प्राइस - 69200 रुपये
बुधवारी काय होते सोन्याचे दर?
बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव 717 रुपये प्रति तोळाने कमी झाले होते. यानंतर सोन्याचे दर प्रति तोळा 46,102 रुपये झाले होते. तर चांदीच्या किंमतीमध्ये काल 1,274 रुपयांची घसरण होऊन दर 68,239 रुपये प्रति किलोग्राम झाले होते.
(हे वाचा-LPG Gas Cylinder: 769 रुपयांचा गॅस सिलेंडर 69 रुपयांत, अशाप्रकारे मिळेल फायदा)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात असे जाहीर केले की, सोन्याचांदीवरील आयात शुल्क (import tax) घटवण्यात येत आहे. सोन्याचांदीवरील आयात शुल्क 5 टक्क्याने घटवले आहे. सध्या सोन्याचांदीवर 12.5 टक्के आयात शुल्क द्यावे लागत आहे, या कपातीच्या निर्णयानंतर केवळ 7.5 टक्के आयात शुल्क द्यावे लागेल. यामुळे आणखी काही प्रमाणात सोन्याचांदीचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver prices today, Gold prices today, Money, Silver