मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI ची खास सुविधा! पैशांची गरज भासल्यास काढू शकता बँक बॅलन्सपेक्षा अधिक रक्कम

SBI ची खास सुविधा! पैशांची गरज भासल्यास काढू शकता बँक बॅलन्सपेक्षा अधिक रक्कम

 स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SBI) त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा देत आहे, ज्यामुळे ते त्यांच्या बँक खात्यातून (Bank account) शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढू शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SBI) त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा देत आहे, ज्यामुळे ते त्यांच्या बँक खात्यातून (Bank account) शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढू शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SBI) त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा देत आहे, ज्यामुळे ते त्यांच्या बँक खात्यातून (Bank account) शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढू शकतात.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SBI) त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा देत आहे, ज्यामुळे ते त्यांच्या बँक खात्यातून (Bank account) शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढू शकतात.  बँकेच्या या सुविधेला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी (Overdraft Facility) म्हटले जाते. जाणून घ्या या सुविधेबाबत.

काय आहे ओव्हरड्राफ्ट सुविधा?

ओव्हरड्राफ्ट एक प्रकारचे लोन आहे. यामध्ये ग्राहक त्यांच्या बँक खात्यातून शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढू शकतात. ही अतिरिक्त रक्कम ग्राहकांना निश्चित कालावधी परत करावी लागते आणि त्यावर व्याज देखील आकारले जाते. व्याज दिवसागणिक मोजले जाते. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी कोणतीही बँक किंवा नॉन-फायनान्शिअल कंपनी (NBFC) देते. तुम्हाला मिळणाऱ्या ओव्हरड्राफ्टची मर्यादा काय असेल, हे बँक किंवा एनबीएफसी निश्चित करतात.

(हे वाचा-कोरोना काळात मोठ्या प्रमाणात झाला या पदार्थाचा खप, तुम्ही देखील करू शकता व्यवसाय

बँक त्यांच्या काही ग्राहकांना प्रीअप्रूव्ह्ड ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देते. मात्र काही ग्राहकांना यासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागते. याकरता लेखी स्वरुपात इंटरनेट बँकिंगसाठी अर्ज करावा लागतो. काही बँक या सुविधेसाठी प्रोसेसिंग फीज देखील घेतात. सिक्यूअर्ड आणि अनसिक्यूअर्ड असे दोन प्रकारचे ओव्हरड्राफ्ट असतात. सिक्यूरड ओव्हरड्राफ्टमध्ये सिक्यूरिटीसाठी काही गहाण ठेवले जाते.

(हे वाचा-जर तुमचीही एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत तर सावधान! होऊ शकते मोठे नुकसान)

तुम्ही एफडी, शेअर्स, घर, पगार, इन्शूरन्स पॉलिसी, बाँड्स इ. गोष्टींवर ओव्हरड्राफ्ट मिळवू शकता. यावर सोप्या भाषेत एफडी किंवा शेअर्सवर कर्ज घेणे असे देखील म्हटले जाते. असे केल्यानंतर एक प्रकारे या गोष्टी बँक किंवा NBFC कडे गहाण राहतात.  जर तुमच्याकडे सिक्यूरिटी स्वरुपात काही नसेल, तरी देखील ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. याला अनसिक्यूअर्ड ओव्हरड्राफ्ट असे म्हटले जाते. उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड विड्रॉल.

मिळेल हा फायदा

जर तुम्ही एखादे कर्ज घेतले तर त्याची परतफेड करण्यासाठी एक कालावधी निश्चित असतो. जर तुम्ही कर्ज कालावधी आधी चुकवले तर त्यावेळी प्रीपेमेंट चार्ज द्यावा लागतो. ओव्हरड्राफ्टमध्ये असे होत नाही. तुम्ही निश्चित  केलेल्या अवधीआधी कोणत्याही चार्जशिवाय पैसे चुकवू शकता.

(हे वाचा-जुलैमध्ये सोन्याच्या या योजनेत गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली,वाचा काय आहे फायदा)

त्याशिवाय यावर व्याज देखील तेवढ्याच काळासाठी द्यावे लागेल, जेवढा वेळेपर्यंत ओव्हरड्राफ्टेट अमाउंट तुमच्याकडे असेल. ही सुविधा कर्ज घेण्यापेक्षा जास्त सोपी आणि सुखकर आहे.

हे लक्षात ठेवा

जर तुम्ही ओव्हरड्राफ्टच्या रकमेची परतफेड नाही करू शकला, तर तुमच्याद्वारे गहाण ठेवलेल्या वस्तूतून याची परतफेड केली जाईल. ओव्हरड्राफ्टची रक्कम तुम्ही गहाण ठेवलेल्या वस्तूच्या किंमतीपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वरची रक्कम भरावी लागेल.

First published:

Tags: SBI