मराठी बातम्या /बातम्या /मनी /जर तुमचीही एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत तर सावधान! होऊ शकते मोठे नुकसान

जर तुमचीही एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत तर सावधान! होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये खाते काढले आहे परंतू त्याचा वापर होत नसल्यामुळे ते खाते बंद करणे योग्य ठरेल. जाणून घ्या एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास काय नुकसान होऊ शकते.

जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये खाते काढले आहे परंतू त्याचा वापर होत नसल्यामुळे ते खाते बंद करणे योग्य ठरेल. जाणून घ्या एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास काय नुकसान होऊ शकते.

जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये खाते काढले आहे परंतू त्याचा वापर होत नसल्यामुळे ते खाते बंद करणे योग्य ठरेल. जाणून घ्या एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास काय नुकसान होऊ शकते.

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये खाते काढले आहे परंतू त्याचा वापर होत नसल्यामुळे ते खाते बंद करणे योग्य ठरेल. कारण हे खाते सुरु ठेवण्यासाठी तुम्हाला मिनिमम बॅलन्स देखील त्या खात्यामध्ये ठेवावा लागेल. असे न केल्यास बँक तुमच्याकडून भरभक्कम शुल्क देखील वसूल करुन घेऊ शकते. तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही एखादे बँक खाते बंद करता तर त्यासंबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला डी-लिंक करावी लागतील. कारण बँक खात्याशी गुंतवणूक, कर्ज, क्रेडिट कार्ड पेमेंट आणि वीम्याशी संबंधित पेमेंट जोडलेले असतात. जाणून घ्या तुम्ही तुमचे खाते कसे बंद कराल

-सध्याच्या काळात अनेकजण लवकर लवकर नोकऱ्या बदलतात आणि अशावेळी त्यांची कंपनी त्यांच्या पद्धतीने नवीन सॅलरी बँक अकाउंट उघडते. त्यामुळे बऱ्याचदा आधीच्या कंपनीने काढलेले खाते निष्क्रिय होऊन जाते. कोणत्याही खात्यामध्ये 3 महिन्यापर्यंत सॅलरी न आल्यासे ते आपोआप बचत खात्यामध्ये बदलते.

(हे वाचा-Gold Price Today: मोठ्या घसरणीनंतर शुक्रवारी पुन्हा वाढले सोन्याचे भाव)

-ते खाते बचत खात्यामध्ये बदलल्यानंतर त्याचे नियम देखील बदलतात. अशावेळी खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स असणे देखील गरजेचे होऊन जाते. अन्यथा बँकेकडून दंड वसुलला जाऊ शकतो.

-जास्त बँक खाती असल्यास आयकर भरताना देखील तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

-त्याचप्रमाणे सर्व बँकांचे स्टेटमेंट ठेवणे अतिरिक्त काम होऊ शकते. निष्क्रिय खात्याचा ठीक वापर न केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

-समजा तुमच्याकडे 4 बँक खाती आहेत ज्यामध्ये मिनिमम बॅलेन्स 10000 रुपये आवश्यक आहे. तुम्हाला 4 टक्के व्याजदराच्या हिशोबाने यावर 1600 रुपये व्याज मिळेल. जर तुम्ही ही खाती बंद करून हेच पैसे म्युच्यूअल फंड किंवा इतर पर्यायांमध्ये गुंतवल्यास जवळपास 10 टक्के अधिक फायदा तुम्हाला मिळेल.

(हे वाचा-पंतप्रधानांनी केली Health ID Card ची घोषणा, वाचा सामान्यांचा काय होणार फायदा)

कसे कराल खाते बंद?

-खाते बंद करताना तुम्हाला डी-लिंकिंग खाते फॉर्म भरावा लागू शकतो. बँकेच्या शाखेमध्ये अकाउंट क्लोजर फॉर्म उपलब्ध असतो.

-तुम्हाला खाते बंद करण्यासाठी त्याचे कारण सांगावे लागेल. जर तुमचे जॉइंट खाते असेल तर सर्व खातेधारकांचे हस्ताक्षर आवश्यक आहे.

-तुम्हाला आणखी एक फॉर्म भरावा लागेल, ज्यात त्या खात्याची माहिती द्यावी लागेल ज्यामध्ये या खात्यातील सर्व पैसे ट्रान्सफर करायचे आहेत.

-बँक खाते बंद करण्यासाठी तुम्हाला स्वत: बँक शाखेमध्ये जावे लागेल

खाते बंद करण्यासाठी काय आहे शुल्क?

बँक खाते उघडल्यानंतर 14 दिवसांच्या आतमध्ये बंद केल्यास बँक कोणतेही शुल्क आकारत नाही. पंधराव्या दिवसापासून 1 वर्षापर्यंतच्या काळात तुम्ही खाते बंद करत असाल तर क्लोजर चार्ज द्यावा लागतो. साधारणपणे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खाते बंद करायचे असेल तर क्लोजर चार्ज लागत नाही.

(हे वाचा-कोरोनाच्या 3 लशी विविध टप्प्यात, भारतीयांपर्यंत पोहोचवण्याची तयारी पूर्ण- PM)

बँकेकडून तुम्हाला वापरण्यात न आलेले चेकबुक आणि डेबिट कार्ड बँक क्लोजर फॉर्मबरोबर जमा करण्यास सांगण्यात येईल. खात्यामधील पैसे तुम्हाला रोख रकमेच्या स्वरुपात (केवळ 20 हजारांपर्यंतची रक्कम) मिळू शकेल किंवा अन्य बँक खात्यातही तुम्हाला पैसे ट्रान्सफर करता येतील.

First published:

Tags: Saving bank account