कोरोना काळात मोठ्या प्रमाणात झाला या पदार्थाचा खप, तुम्ही देखील करू शकता व्यवसाय

कोरोना काळात मोठ्या प्रमाणात झाला या पदार्थाचा खप, तुम्ही देखील करू शकता व्यवसाय

कोरोनाच्या संकटकाळात बिस्किटांची विक्री वाढल्याचे पाहायला मिळाले. अशा वेळी बेकरी प्रोडक्ट बनवण्याचे युनिट सुरू करणे हा व्यवसायासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : कोरोनाच्या संकटकाळात सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊममध्ये बहुतांश वस्तुंची विक्री कमी झाली आहे. मात्र या कालावधी दरम्यान बिस्किटांची विक्री वाढल्याचे पाहायला मिळाले. सर्वच कंपन्यांच्या बिस्किटांची विक्री यावेळी वाढली आहे. यामुळे या कंपन्यांना लॉकडाऊन काळात बराच फायदा झाला आहे. यापैकी पारले कंपनीने तर रेकॉर्ड स्तरावर विक्री केली होती. पारले-जी बिस्किटाचा एवढा जास्त खप झाला की, गेल्या 82 वर्षांतील त्यांचा रेकॉर्ड तुटला. अशा वेळी बेकरी प्रोडक्ट बनवण्याचे युनिट सुरू करणे हा व्यवसायासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

जर तुम्ही बेकरी इंडस्ट्री सुरू करण्याच्या विचारामध्ये असाल तर यासाठी मोदी सरकार (Modi Government)कडून तुम्हाला मदत मिळू शकते. मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला केवळ 1 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. एकूण खर्चाच्या 80 टक्के पर्यंतच्या फंडची मदत सरकारकडून मिळू शकते.

(हे वाचा-आणखी कमी होणार सोन्याचे भाव! शुक्रवारपासून 3395 रुपयांनी उतरले सोने)

याकरता सरकारकडून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या बिझनेस स्ट्रक्चरिंगनुसार, तुम्हाला सर्व खर्च वजा करून प्रत्येक महिन्याला 30 हजारांपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो.

किती होईल खर्च?

हा उपक्रम सुरू करण्यासाठी एकूण 5.36 लाख रुपयापर्यंत खर्च येईल. यामध्ये तुम्हाला 1 लाखाचा गुंतवणूक करायची आहे. मुद्रा योजनेअंतर्गत जर तुमची निवड झाली तर बँकेकडून टर्म लोन 2.87 लाख आणि वर्किंग कॅपिटल लोन 1.49 लाख मिळेल. या प्रोजेक्टसाठी तुमच्याकडे 500 स्क्वेअर फीट इतकी जागा असणे आवश्यक आहे. जर नसेल तर भाडेतत्वावर घेऊन या प्रोजेक्टच्या फाइलमध्ये तसे नमुद करावे लागेल.

किती होईल नफा?

सरकारने जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे, त्या हिशोबाने 5.36 लाख रुपयांपैकी एकूण वार्षिक उत्पादन आणि त्याच्या विक्रीचा अंदाज खालीलप्रमाणे असेल

4.26 लाख रुपये: पूर्ण वर्षासाठी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन

(हे वाचा-करदात्यांसाठी पंतप्रधानांची मोठी घोषणा; फेसलेस असेसमेंट, टॅक्सपेअर चार्टर लागू)

20.38 लाख रुपये: पूर्ण वर्षामध्ये एवढे उत्पादन होईल की ज्याच्या विक्रीनंतर 20.38 लाख रुपये मिळतील.  यामध्ये बेकरी प्रोडक्टची विक्री किंमत बाजारात मिळणाऱ्या दुसऱ्या उत्पादनाच्या विक्री किमतीवर आधारित कमी करून निश्चित केली गेली आहे.

6.12 लाख रुपये: ग्रॉस ऑपरेटिंग प्रॉफिट

70 हजार: अॅडमिनिस्ट्रेशन आणि सेल्सचा खर्च

60 हजार: बँक कर्जावरील व्याज

60 हजार: अन्य खर्च

नेट प्रॉफिट: 4.2 लाख रुपये वार्षिक

मुद्रा योजनेसाठी करा अर्ज

याकरता तुम्ही पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. ज्यामध्ये तुम्हाला नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, शिक्षण, सध्याचे उत्पन्न आणि किती कर्ज हवे आहे इ. माहिती द्यावी लागेल. यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फीस किंवा गारंटी फीस घेतली जात नाही. कर्जाची रक्कम तुम्ही 5 वर्षात फेडू शकता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 14, 2020, 10:27 AM IST

ताज्या बातम्या