Home /News /money /

खूशखबर! तुमच्या होम आणि कार लोनवरील EMI होणार कमी, SBI-PNB नंतर या बँकेने घटवले व्याजदर

खूशखबर! तुमच्या होम आणि कार लोनवरील EMI होणार कमी, SBI-PNB नंतर या बँकेने घटवले व्याजदर

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने सणासुदीच्या काळात कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने होम लोन आणि कार लोनच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे.

    नवी दिल्ली, 17 डिसेंबर: बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने सणासुदीच्या काळात कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने होम लोन आणि कार लोनच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. याआधी स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील गृहकर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक ऑफ बडोदाने होम लोन (Home Loan offer) आणि कार लोन (car Loan Offer) वर आधीच्या दरात 0.25 टक्क्यांची सूट जाहीर केली आहे. याशिवाय बँकेने प्रोसेसिंग फीस (Processing fee) मध्ये देखील सूट देण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या गृहकर्जावरील व्याज दर  6.75 टक्के तर वाहन कर्जावरील व्याजदर 7 टक्क्यांनी सुरू होत आहे. बँकेने काय दिली प्रतिक्रिया? बँकेने एका निवेदनात असे म्हटले आहे की, ग्राहक कर्जाला त्वरित मंजुरी मिळावी याकरता बँकेची वेबसाइट आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून देखील अर्ज करू शकतात. शिवाय डोअर स्टेप सुविधा देखील उपलब्ध आहेत. बँकेचे महाव्यवस्थापक एच.टी. सोलंकी म्हणाले, 'आगामी सणांमध्ये किरकोळ कर्जावर दिल्या जाणाऱ्या या ऑफरसह, आम्ही आमच्या विद्यमान ग्राहकांना उत्सवाची भेट देऊ इच्छितो. यासह, आम्ही बँकेत सामील होणाऱ्या नवीन ग्राहकांना घर आणि कार कर्ज घेण्याची आकर्षक संधी देखील देऊ इच्छितो.' हे वाचा-ITCची डीलरशीप देण्याच्या नावाखाली मोठा फ्रॉड! सावध राहा अन्यथा पैसे होतील लंपास PNB ने स्वस्त केलं कर्ज सणासुदीच्या काळात पंजाब नॅशनल बँकने  (PNB) ग्राहकांना कर्जाची उपलब्धता करून देण्यासाठी फेस्टिव्हल बोनान्झा ऑफर लाँच केली आहे. फेस्टिव्ह ऑफरअंतर्गत बँक किरकोळ प्रोडक्ट्स असणाऱ्या गृहकर्ज, वाहन कर्ज, प्रॉपर्टी लोन, वैयक्तिक कर्ज, पेन्शन लोन आणि गोल्ड लोनवरील सेवा शुल्क आणि दस्तावेज शुल्क माफ करणार आहे. PNB आता होम लोनवर 6.80% आणि कार लोनवर 7.15 टक्क्यांनी सुरू होणारे व्याजदर देते. बँक  8.95% टक्के दराने वैयक्तिक कर्ज देते, हा दर सर्वात कमी आहे. बँकेने आकर्षक व्याजदराने होम होम टॉप-अप देण्याचीही घोषणा केली आहे. ग्राहक देशभरातील पीएनबीच्या कोणत्याही शाखेच्या माध्यमातून किंवा डिजिटल चॅनलच्या माध्यमातून 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध आकर्षक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. हे वाचा-बेसिक सॅलरी 15000 रुपयांवरुन वाढून होणार 21000 रुपये! मोदी सरकार करणार बदल गृहकर्जावर SBI देतंय सवलत देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने  (State Bank of India - SBI) गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी फेस्टिव्ह ऑफर्सची सुरुवात केली आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना परवडणारे होम लोन घेता यावे, हे या ऑफर्समागदे उद्दिष्ट आहे. एसबीआयने होम लोनवरील व्याजदर कमी केला आहे. यासह SBI ने 6.70 टक्के दराने क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोन देण्याची ऑफर आणली आहे. यामध्ये क्रेडिट स्कोअरशी संबंधित कर्जाची रक्कम कितीही असू शकते. याआधी 75 लाखांपेक्षा जास्त लोनवर 7.15 टक्के दराने पेमेंट करावे लागत असे. फेस्टिव्ह ऑफर्सना सुरुवात झाल्यानंतर आता कमीतकमी 6.70 टक्के दराने कर्ज मिळवतील. या ऑफरमुळे 45bps ची सेव्हिंग होईल. एकूण मिळून 75 लाखाचे कर्ज 30 वर्षांसाठी घेतले असेल तर जवळपास 8 लाख रुपयांपेक्षा जास्तीची बचत होईल. एसबीआयने पगारदार आणि वेतन नसलेल्या गृहकर्ज कर्जदारांमधील फरक दूर केला आहे. आतापर्यंत, वेतन नसलेल्या कर्जदारांसाठी व्याज दर पगार वर्ग कर्जदारांपेक्षा 15bps जास्त होता. सणासुदीच्या काळात बाजार सेंटिमेंटना चालना देण्यासाठी बँकेने प्रोसेसिंग फीस (processing fees) देखील पूर्णपणे माफ केली आहे. बँकेने कर्जदारांच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित व्याजदरात सवलत दिली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Home Loan, Pnb, SBI, Sbi home loan

    पुढील बातम्या