• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • ITC कंपनीची डीलरशीप देण्याच्या नावाखाली होतोय मोठा फ्रॉड! सावध राहा अन्यथा पैसे होतील लंपास

ITC कंपनीची डीलरशीप देण्याच्या नावाखाली होतोय मोठा फ्रॉड! सावध राहा अन्यथा पैसे होतील लंपास

तुम्ही कोणतं नवं काम सुरू करण्याचं नियोजन करताय का किंवा कोणत्या कंपनीची फ्रँचायझी (Franchise) किंवा डीलरशिप (Dealership) घ्यायचा विचार करता आहात का? मग थोडं सावध राहा

  • Share this:
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: तुम्ही कोणतं नवं काम सुरू करण्याचं नियोजन करताय का किंवा कोणत्या कंपनीची फ्रँचायझी (Franchise) किंवा डीलरशिप (Dealership) घ्यायचा विचार करता आहात का? मग थोडं सावध राहा. अलीकडच्या काही दिवसांत वेगवेगळ्या कंपन्यांची डीलरशिप आणि फ्रँचायझी देण्याच्या आणि डिस्ट्रिब्युटर (Distributor) बनवण्याच्या नावाखाली काळे धंदे मोठ्या प्रमाणावर चालले आहेत. कोरोना काळात अनेकांनी नोकरी गमावली आहे. त्यामुळे अशा व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत. अशा व्यक्तींना हेरून त्यांना या प्रकरणात टार्गेट केलं जात आहे. अशा कोणत्या फ्रॉडमध्ये सापडलात, तर गाठीशी असलेली पुंजीही संपून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही फेसबुकवर जरूर सर्फिंग (Facebook Surfing) करत असाल. त्या वेळी अनेकदा स्पॉन्सर्ड पोस्ट्स समोर येत असल्याचंही तुमच्या लक्षात आलं असेल. स्पॉन्सर्ड पोस्ट्स म्हणजे एक प्रकारच्या जाहिराती असतात. या पोस्ट्स दर्शवण्यासाठी फेसबुकला पैसे मिळालेले असतात. साधारणतः आपल्या समोर येणारी एक आड एक पोस्ट स्पॉन्सर्ड असते. म्हणजेच एक पोस्ट आपल्या फेसबुक फ्रेंडची आणि पुढची पोस्ट स्पॉन्सर्ड, अशा पद्धतीने आपल्याला न्यूज फीडचा फ्लो दिसतो. हे वाचा-45 व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला सुरुवात, निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष आयटीसी (ITC) अर्थात इंडियन टोबॅको कंपनी लिमिटेड. या कंपनीबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. ही भारतातली एक खूप मोठी कंपनी आहे आणि या कंपनीची अनेक प्रॉडक्ट्स आपण वापरतो. आशीर्वाद आटा, सनफीस्ट बिस्किट्स, बिंगो वेफर्स, यिप्पी नूडल्स, इत्यादी सारी उत्पादनं आयटीसी या कंपनीचीच आहेत. या कंपनीने भारताच्या कानाकोपऱ्यांतल्या शहरांत, गावांत अनेकांना आपली डीलरशिप दिली आहे. असं असतानाही फेसबुकवर आयटीसी या कंपनीचं एक पेज तयार करून या कंपनीची डीलरशिप दिली जात असल्याबद्दलची पोस्ट त्यावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पोस्ट्स जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना स्पॉन्सरही करण्यात आलं आहे. अशा पद्धतीचं फेक अर्थात खोटं फेसबुक पेज (Fake Facebook Page) बनवलं गेलेली आयटीसी ही एकमेव कंपनी नाही. अशा प्रकारे अनेक कंपन्यांच्या नावाने फेक फेसबुक पेजेस तयार करण्यात आली आहेत. त्या पेजेसवरून संबंधित कंपनी असल्याचं भासवून पोस्ट्स केल्या जातात. त्या पोस्ट फेसबुकवर स्पॉन्सर्ड पोस्ट्स (Sponsored Posts) म्हणून प्रसिद्ध करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. काही जण त्यात अडकतात. त्यांना ते खरंच वाटतं. कारण कंपनीचं नाव मोठं असतं. म्हणून ते काही तरी आर्थिक व्यवहार करून बसतात आणि मग फसतात. म्हणूनच अशा प्रकारच्या फेक फेसबुक पेजेसपासून, तसंच सोशल मीडियावरच्या खोट्या जाहिरातींपासून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हे वाचा-46 हजारांपेक्षा जास्त सोन्याचे दर, रेकॉर्ड हायपेक्षा सोनं 10000 रुपयांनी स्वस्त काही तरी कामाच्या शोधात असलेल्या व्यक्ती फ्रँचायझी घेण्याचा विचार करतात आणि गुगलवर सर्च करतात. तुम्ही गुगलवर काय सर्च केलं आहे, याची माहिती तुमच्या फोनवरच्या बाकीच्या अॅप्सना मिळत असते. त्यामुळे फेसबुक किंवा अन्य अॅप्सवरही तुम्हाला त्या सर्चच्या अनुषंगाने जाहिराती दिसू लागतात. तंत्रज्ञानामुळे हे सगळं शक्य झालं आहे. फेसबुकवर दिसलेल्या जाहिरातीवर क्लिक करून कोणी वेबसाइटवर गेलं, तर आपलं नाव, नंबर, पत्ता वगैरे सगळी माहिती तिथे भरली जाते. ती माहिती घोटाळेबाजांपर्यंत पोहोचते. त्यानंतर त्या नंबरवर कोणाचा तरी फोन येतो. फोनवर बोलणारी व्यक्ती आयटीसीमधून बोलत असल्याचं सांगते. ती सगळी माहिती घेते. शहरात डिस्ट्रिब्युटरशिप घेण्यासाठी पाच-सात लाख, तर गावात घेण्यासाठी 2-4 लाख रुपये भरावे लागणार असल्याचं सांगितलं जातं; मात्र कोरोनामुळे यात सवलत दिली जात असल्याचंही सांगितलं जातं. समोरच्या व्यक्तीचा विश्वास बसला, की कायदेशीर प्रक्रियेच्या नावाखाली 50 हजार, एक लाख रुपये मागितले जातात. शेवटी ती व्यक्ती जाळ्यात अडकत जाते. चार-पाच लाख रुपये त्या व्यक्तीकडून वसूल झाले, की मग संबंधित फोन (Fraud) बंद केले जातात. त्यानंतर त्या व्यक्तीला लुटलं गेल्याचा साक्षात्कार होतो. हे वाचा-Petrol Price Today: मुंबईत पेट्रोल शंभरीपारच! इंधनाचे भाव सामान्यांना न परवडणारे https://www.itcportal.com ही आयटीसी कंपनीची खरी, अधिकृत वेबसाइट आहे. त्यामुळे या वेबसाइटवर जाऊन अधिकृत कोणती माहिती तिथे उपलब्ध आहे ते पाहावं आणि मगच काही व्यवहार करायचे असले, तर करावेत, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. अशा प्रकारचे काही घोटाळे पूर्वीही झाले होते. कंपनीने त्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती, असंही कंपनीने सांगितलं. खोट्या जाहिरातींमध्ये आयटीसी कंपनीच्या वेबसाइट्स म्हणून https://itcportals.org किंवा https://itcportal.org.in अशा काही यूआरएल्स दिल्या जात आहेत. त्या वाचून पटकन काही जणांचा विश्वास बसू शकतो; मात्र कोणतीही जाहिरात बारकाईने पाहिल्याशिवाय, उलटसुलट तपासणी करून खात्री केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, असं सांगण्यात आलं आहे. इतर कोणत्या कंपनीचे प्रोडक्टही आयटीसीचे असल्याचं या जाहिरातींमध्ये सांगण्यात आलं आहे. फ्रॉड करणाऱ्यांकडून झालेली ही एक चूक आहे. जसं की तुम्ही वरील फोटोमध्ये पाहिलं तर त्यात टाटा नमक (Tata Salt), हॉर्लिक्स (Horlicks) आणि नवरत्न तेल हे प्रोडक्ट्स् देखील आहेत. हे प्रोडक्ट आयटीसीचे नाही आहेत. टाटा नमक टाटा ग्रुप (Tata Group) चे आहे, हॉर्लिक्स हिंदुस्तान यूनिलीव्हरचे (Hindustan Unilever)  आहे तर नवरत्न तेल  ईमामी (Emami) कंपनी बनवते. असे अनेक प्रोडक्ट या जाहिरातींमध्ये दाखवले आहेत की जे आयटीसीचे नाही आहेत. या फ्रॉडपासून कसे वाचाल? कोणतीही फ्रँचायझी घ्यायची असेल, तर त्या कंपनीचं कोणतंही एक प्रॉडक्ट आधी खरेदी करावं. प्रत्येक कंपनीच्या कोणत्याही प्रॉडक्टवर फोन नंबर आणि अधिकृत वेबसाइट ही माहिती हमखास दिलेली असते. त्या माहितीच्या आधारे तुम्ही नेमक्या आणि योग्य ठिकाणी संपर्क साधू शकाल. असं झालं तर फसवणूक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
First published: