• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • SBI ग्राहकांसाठी ऑफर्सचा धमाका! गृहकर्जासह कार-गोल्ड आणि पर्सनल लोनवर धमाकेदार सवलत

SBI ग्राहकांसाठी ऑफर्सचा धमाका! गृहकर्जासह कार-गोल्ड आणि पर्सनल लोनवर धमाकेदार सवलत

SBI ग्राहकांना गृहकर्जापासून वैयक्तिक कर्ज, गोल्ड लोन, कार लोनवर धमाकेदार सवलत देत आहे. प्रोसेसिंग फी वर तर बँकेकडून 100 टक्के सूट दिली जात आहे. याशिवाय FD, पेन्शन लोनवर देखील सूट मिळते आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 ऑगस्ट: देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर्स घेऊन आली आहे. SBI ने किरकोळ कर्ज आणि ठेवींवर अनेक ऑफर्स दिल्या आहेत. बँकेने गृहकर्जावर (Home loan) प्रोसेसिंग फीस (Processing Fee) माफ केली आहे. बँकेने सर्व चॅनेल्सवर कार लोन ग्राहकांसाठी प्रोसेसिंग फीवर 100 टक्के सवलतीची घोषणा केली आहे. ग्राहकांना त्यांच्या कार लोनवर 90 टक्क्यापर्यंत ऑन-रोड फाइयनान्सिंगचा फायदा घेता येईल. याशिवायही बँकेने काही ऑफर्स देऊ केल्या आहेत. कार लोन (Car Loan) एसबीआय योनो (SBI YONO) च्या माध्यमातून वाहन कर्जासाठी (Car Loan)अर्ज करणाऱ्या ग्राहकांना व्याजदरामध्ये 25 बीपीएस (25 Bps) सवलत देत आहे. SBI YONO च्या युजर्सना कार लोनवर 7.5 टक्के इतका व्याजदर असेल. हे वाचा-PNB ग्राहकांसाठी खूशखबर! गृहकर्ज घेतना मिळणार ही सवलत, 30 सप्टेंबर शेवटची तारीख गोल्ड लोन (Gold loan) गोल्ड लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी बँकेने व्याजदरात 75 बीपीएसची कपात केली आहे. सर्व चॅनेल्सवर बँकेकडून मिळणारे गोल्ड लोन  7.5 टक्के दराने दिलं जाईल.  शिवाय योनो अॅपच्या माध्यमातून अर्ज करणाऱ्या सर्व ग्राहकांना प्रोसेसिंग फी देखील माफ करण्यात आली आहे. पर्सनल लोन आणि पेन्शन लोन (Personal and Pension loan) वैयक्तिक कर्ज आणि पेन्शन कर्जावर बँकने सर्व चॅनेल्सवर  प्रोसेसिंग फीवर 100 टक्के सवलत दिली आहे. बँकेने वैयक्तिक कर्जासाठी (personal loan) अर्ज करणाऱ्या कोव्हिड योद्ध्यांना विशेष सूट दिली आहे. ही सवलत 50 बीपीएसची असणार आहे. लवकरच ही सवलत कार आणि गोल्ड लोनवर देण्यात येणार आहे. फिक्स्ड डिपॉझिट (SBI FD) बँकेने प्लॅटिनम फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 15 ऑगस्ट 2021 ते 14 सप्टेंबर 2021 पर्यंत काढण्यात आलेल्या एफडीवर 15 बीपीएस अधिक व्याज मिळेल, या एफडीचा कालावधी 75 दिवस, 75 आठवडे आणि 75 महिने इतका असेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: