नवी दिल्ली, 19 ऑगस्ट: पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर (Good News for PNB Customers) आहे. पंजाब नॅशनल बँकेने 75व्या स्वातंत्र्य दिनी ग्राहकांना खास ऑफर देऊ केली आहे. बँकेने 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ग्राहकांना होम लोनवरील (Home Loan in Punjab National Bank) प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन शुल्क (processing fee & documentation charges) पूर्णपणे माफ केले आहे. अर्थात 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन चार्जमध्ये पूर्णपणे सवलत मिळणार आहे.
Get freedom from processing fee & documentation charges with our Independence Day Home Loan offer.
What else could you ask for?#Homeloan #offers #2021goals pic.twitter.com/Rm3LKRosd6 — Punjab National Bank (@pnbindia) August 18, 2021
बँकेने ट्वीट करत दिली माहिती
बँकेने ट्वीट करत या सवलतीबाबत ग्राहकांना माहिती दिली आहे. यामध्ये बँकेने स्वातंत्र्य दिन गृहकर्ज ऑफर (PNB Independence Day Home Loan offer) बाबत भाष्य केले आहे. ही 0% प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन चार्जची ऑफर ग्राहकांना 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार आहे.
हे वाचा-EPFO ने व्याजाच्या पैशासंदर्भात दिलं महत्त्वाचं अपडेट, खात्यात कधी येणार पैसे?
PNB 6.80% दराने देत आहे गृहकर्ज
याआधी पंजाब नॅशनल बँकेत गृहकर्जावर 0.50 टक्के प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन शुल्क आकारले जात आहे. आता हे शुल्क 30 सप्टेंबरपर्यंत नाही आकारले जाणार आहे. जर एखादी बँक होम लोन देते तेव्हा ग्राहकांना याकरता एकरकमी प्रोसेसिंग फी भरावी लागते. या शुल्कातून पीएनबीने सवलत दिली आहे. सध्या पीएनबी गृहकर्जावर 6.80% दराने व्याज आकारत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.