जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांनो सावधान! 17 मार्चपासून...

SBI क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांनो सावधान! 17 मार्चपासून...

एसबीआयचं क्रेडिट कार्ड वापरत असाल तर अवश्य वाचा ही बातमी

एसबीआयचं क्रेडिट कार्ड वापरत असाल तर अवश्य वाचा ही बातमी

SBI Credit Card ने रेंट पेमेंट करण्याच्या चार्जेसमध्ये बदल करण्यात आले आहेत. आपल्या ग्राहकांना ईमेल पाठवून, बँकेने सांगितले की, 17 मार्च 2023 पासून, क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी 199 रुपये प्रोसेसिंग फीस आकारली जाईल. 18% GST स्वतंत्रपणे लागू होईल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 फेब्रुवारी: तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बँकेने आपल्या क्रेडिट कार्डधारकांना ईमेल पाठवून नवीन चार्जेजविषयी माहिती दिली आहे. या ईमेलनुसार, यापूर्वी क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी 99 रुपये प्रोसेसिंग फी होते. आता ती दुप्पट करण्यात आली आहे. 17 मार्च 2023 पासून बँकेने ती 199 रुपये केली आहे. तसेच जीएसटी चार्जेस वेगळे आकारले जाणार आहेत.

SBI किती चार्ज घेते?

SBI कार्डच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर 2022 रोजी बँकेने रेंट पेमेंटवर 99 रुपये ट्रांझेक्शन चार्ज आकारले. याशिवाय 18 टक्के जीएसटी स्वतंत्रपणे आकारला जातो. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, मर्चेंट ईएमआय ट्रांझेक्शन चार्ज देखील 15 नोव्हेंबर रोजी 99 रुपयांवरून 199 रुपये करण्यात आले होते. GST स्वतंत्रपणे आकारला जातो.

Car Insurance घेताय? या 8 टिप्स ठेवा लक्षात, होईल फायदाच फायदा

HDFC बँक किती चार्ज आकारते?

SBI व्यतिरिक्त, इतर अनेक बँका आहेत ज्या त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे रेंट पेमेंट करण्याची सुविधा प्रदान करतात. HDFC बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, तुम्हाला HDFC क्रेडिट कार्डच्या मदतीने भाडे जमा करण्यापूर्वी 45-50 दिवसांचा इंटरेस्ट फ्री क्रेडिट पीरियड मिळतो. HDFC बँक रेंटल अमाउंटच्या 1% चार्ज आकारते जो दुसऱ्या महिन्यापासून लागू होते.

काय सांगता! स्वतःच्याच केसांद्वारे करता येते कमाई, दरमहा मिळतील 25 हजार रुपये

ICIC बँक किती चार्ज आकारते?

ICIC बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही ICICI क्रेडिट कार्डच्या मदतीने भाडे भरले तर ते देखील भाड्याच्या रकमेच्या 1% असेल. ऑक्टोबर 2022 पासून बँकेने ही सुविधा सुरू केली आहे.

SBI कस्टमर्सला डेबिट कार्डवर मिळतात ‘या’ सेवा, तुम्हाला माहिती आहेत का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात