स्टेट बँक ऑफ इंडिया, देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. एसबीआय बँक डेबिट कार्डवर अनेक ऑनलाइन सर्व्हिस देते. मात्र तुम्हाला याविषयी कदाचित माहिती नसेल. सध्या UPI चा ट्रेंड वाढला आ हे. यामुळे मोठ्या व्यवहारांसाठी देखील लोक UPI कडे वळले आहे. परंतु डेबिट कार्डचं स्वतःचं स्थान आहे. बँक अकाउंट उघडल्यावर बँका प्रत्येक ग्राहकाला खात्यासोबत डेबिट कार्ड देतात. जर तुमचे एसबीआयमध्ये बँक खाते असेल, तर तुमच्याकडे डेबिट कार्ड असेलच. यामुळे तुम्हाला यावर मिळणाऱ्या सुविधांची माहिती असणे आवश्य आहे.
कार्ड ब्लॉक करणे : इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही तुमचे कार्ड ब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला onlinesbi.com वर जाऊन लॉग इन करावे लागेल आणि ATM कार्ड सर्व्हिसेज ऑप्शनमध्ये कार्ड ब्लॉक करण्याचा ऑप्शन निवडावा लागेल. याशिवाय, चोरी किंवा हरवल्यास तुम्ही तुमचे कार्ड ऑनलाइन ब्लॉक करू शकता. यासाठी, तुम्ही SBI कस्टमर केअरच्या 1800 11 2211 किंवा 1800 425 3800 क्रमांकावर कॉल करून कस्टमर केअरशी बोलू शकता. तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावरूनच या क्रमांकांवर कॉल करा. तुम्ही 567676 नंबरवर BLOCK XXXX ला ब्लॉक करा (XXXX ऐवजी, तुम्हाला तुमच्या कार्डचे शेवटचे चार अंक टाकावे लागतील.)
कार्ड मर्यादा बदलणे : एसबीआयचे ग्राहक नेटबँकिंगद्वारे एटीएममधून पैसे काढण्याची लिमिट बदलू शकतात. यासाठी तुम्हाला एसबीआयच्या साइटवर जाऊन ई-सर्विसेज टॅब निवडावा लागेल, यामध्ये तुम्हाला ‘ATM Card Limit/Channel/Usage Change’ या ऑप्शनमध्ये 'Change Daily Limit' निवडावं लागेल. तुमचे सॅलरी अकाउंट आहे? मग SBI च्या 'या' स्किमविषयी वाचाच
कार्ड अॅक्टिव्हेशन : तुम्ही तुमचे नवीन डेबिट कार्ड फक्त ऑनलाइन अॅक्टिव्हेशन करू शकता. तुम्हाला SBI पोर्टलवर जाऊन लॉग इन करावे लागेल आणि ई-सर्व्हिसेज सेक्शनमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला ATM Card Services वर जाऊन New ATM Card Activation वर क्लिक करून पुढील प्रोसेस पूर्ण करावी लागेल. टर्म प्लान खरेदी करण्याचा प्लान करताय? मग ही माहिती असायलाच हवी
नवीन कार्डसाठी अर्ज करा: तुम्ही नवीन कार्डसाठी ऑनलाइन अर्जही करू शकता. यासाठी तुम्हाला ई-सर्व्हिसेजवर जावे लागेल. यामध्ये 'ATM card services'मध्ये 'Request ATM/debit card' हा ऑप्शन दिसेल. येथे क्लिक करून तुम्ही पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकता. बँक अकाउंट बंद पडलंय आणि त्यात पैसे अडकलेय? या ट्रिकने सहज काढता येईल अमाउंट
ATM PIN जनरेट करणे : SBI Debit Card साठी ATM PIN तयार करणे देखील खूप सोपे आहे. तुम्हाला SBI ऑनलाइन वेबसाइटवर जावं लागेल. येथे तुम्हाला ई-सर्व्हिसेज सेक्शनमध्ये पुन्हा 'ATM card services' वर जावं लागणार आहे. येथून तुम्हाला एटीएम पिन जनरेशन ऑप्शनवर जाऊन दिलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, त्यानंतर तुमचा पिन जनरेट होईल.