देशात अनेक प्रकारचे कार इंश्योरेंस आहेत, ज्यामुळे लोकांना योग्य इंश्योरेंस पॉलिसी निवडण्यात अनेक अडचणी येतात. मोटार वाहन कायदा 1988 नुसार, भारतातील कार मालकाने त्याच्या वाहनाचा विमा उतरवणे अनिवार्य आहे. तुम्ही कार खरेदी केली असेल किंवा तुमच्या जुन्या वाहनाचा विमा संपला असेल, तर योग्य विमा पॉलिसी कशी निवडावी याच्या काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत.
इंश्योरेंसचे प्रकार? : सर्वात आधी तुम्हाला कोणत्या प्रकारचा विमा प्लान घ्यायचा आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भारतात थर्ड पार्टी इन्शुरन्ससह सर्वसमावेशक विमा प्लान ऑफर केले जातात. वाहनांच्या नुकसानीसाठी स्वतंत्र योजना, इंजिन आणि आगीसाठी स्वतंत्र योजना आणि वाहन चोरीसाठी स्वतंत्र विमा प्लान आहेत. दुसरीकडे, जर तुम्हाला एकाच विमा योजनेत सर्व सुविधा घ्यायच्या असतील, तर तुम्हाला त्यासाठी एक वेगळा विमा प्लान निवडावा लागेल.
योग्य कार इंश्योरेंस प्लान कसा निवडावा : कोणताही कार इंश्योरेंस प्लान निवडण्यापूर्वी एखाद्याने बाजारात उपलब्ध असलेल्या इतर प्लान्ससोबत तुलना केली पाहिजे. आता विमा पॉलिसीमध्ये नेमके काय पाहावे हे आपण जाणून घेणार आहोत.
अॅड-ऑन सुविधा: अॅड-ऑन अतिरिक्त कव्हरेज, जे एक्स्ट्रा रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त प्रीमियम भरून खरेदी केले जाऊ शकते. हे फक्त सर्वसमावेशक विमा पॉलिसी योजनांमध्ये उपलब्ध आहे.
क्लेम करणे शिका : इंश्योरेंस क्लेम कसा करायचा हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून, इंश्योरेंस पॉलिसी घेण्यापूर्वी, एखाद्याने क्लेमच्या प्रक्रियेबद्दल पूर्णपणे जाणून घेतले पाहिजे.
क्लेम सेटलमेंट रेशो तपासा: पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी नेहमी इंश्योरेंस कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशो तपासले पाहिजे. हा रेश्यो एका वर्षात मिळालेल्या दाव्यांच्या संख्येच्या तुलनेत कंपनीने निकाली काढलेल्या दाव्यांच्या संख्येची माहिती देते.
खोटी माहिती देऊ नका : इंश्योरेंस कंपनीला खोटी माहिती देणे घातक ठरु शकते. कंपनीला हे आढळल्यास कंपनी तत्काळ इंश्योरेंस रद्द करु शकते. यामुळे नेहमीच योग्य माहिती द्यावी. ITR भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CBDT ने केली महत्त्वाची घोषणा, म्हटले...
अटी व शर्ती जाणून घ्या : पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी अटी आणि शर्ती पूर्णपणे जाणून घ्या, यासाठी प्रत्येक क्लॉज आणि अटी समजून घेणे आवश्यक आहे. Post Office देतेय कमाई करण्याची संधी! आता घरबसल्या कमवा पैसे
नो-क्लेम बोनसपासून सावध रहा: नो क्लेम बोनस ही इंश्योरेंस कंपनीने प्रीमियम पेमेंटवर दिलेली सूट आहे. अशा परिस्थितीत, ग्राहकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण यासोबतच इतर अनेक प्रकारचे चार्ज जोडले जाऊ शकतात. यासोबतच क्लेमचे पैसेही अडकू शकतात. इन्कम टॅक्स वाचवण्याच्या 6 सर्वात बेस्ट ट्रिक्स, तुमच्या सॅलरीची होईल बचत!