• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • दरमहा पैसे कमावण्यासाठी SBI ची ही स्कीम ठरेल BEST! वाचा काय आहेत फायदे

दरमहा पैसे कमावण्यासाठी SBI ची ही स्कीम ठरेल BEST! वाचा काय आहेत फायदे

SBI Annuity Deposit: SBI च्या योजनेचं नाव SBI अॅन्युइटी डिपॉझिट असे आहे. जाणून घ्या काय आहेत या महत्त्वाच्या योजनेचे फायदे...

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: तुम्ही जर सुरक्षित गुंतवणुकीसाठी (Investment Planning) पर्यायाच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या ठेवी नेहमी अशा ठिकाणी गुंतवायच्या असतात, ज्यामध्ये त्याचे पैसे सुरक्षित असतील आणि त्यातून एक चांगला परतावाही (Good Return in Investment) मिळेल. परंतु कधीकधी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्याने नफ्याऐवजी समस्या निर्माण होतात. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सर्वात सुरक्षित पर्यायांपैकी एक आहे. SBI आपल्या ग्राहकांना मुदत ठेवी (FD Fixed Deposit Scheme) पासून सार्वजनिक भविष्य निधी (PPF in SBI) मध्ये बचत करण्याचा पर्याय देते. तुम्ही बँकेच्या काही योजनांमध्ये गुंतवणूक करून दरमहा कमावू शकता. SBI च्या या नाव योजनेचे नाव SBI Annuity Deposit आहे. जाणून घ्या काय आहेत या महत्त्वाच्या योजनेचे फायदे... काय आहे SBI Annuity Deposit? ही एक प्रकारची फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD स्कीम आहे. यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करावयाची संपूर्ण रक्कम बँकेत जमा करावी लागेल आणि मग तुम्हाला दरमहा व्याजाचे पैसे मिळतील. यामध्ये तुमचे मुद्दल आणि व्याज दोन्ही समाविष्ट असतील. ही योजना 5 वर्षे, 7 वर्षे आणि 10 वर्षांसाठी आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या कालावधीच्या गरजेनुसार गुंतवणूक करू शकता. वाचा-Market Rate today: नवरात्रीनिमित्त फळ-फळावळ झाली महाग; जाणून घ्या ताजे बाजारभाव किती करता येईल गुंतवणूक? यामध्ये पैसे जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही आहे. 15 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठी वेळेआधी अर्थात प्रीमॅच्युअर पैसे काढण्याची परवानगी आहे. अर्थात मुदत ठेवीप्रमाण तुम्हाला त्यानुसार शुल्क मोजावे लागेल. त्यानंतरच्या रकमेवर हा पर्याय मिळत नाही. ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास, कोणत्याही मर्यादेशिवाय मॅच्युरिटीआधी पैसे काढण्याचा पर्याय आहे. किती मिळेल व्याज? 3 वर्षांपासून ते 5 वर्षांपर्यंच्या कमी गुंतवणुकीवर 5.30 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. तर 5 वर्षांपेक्षा जास्त परंतु 10 वर्षांपेक्षा कमी गुंतवणूकीसाठी, 5.40 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. वाचा-Vodafone Idea साठी येणार 'अच्छे दिन', 1000 कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध या योजनेत गुंतवलेल्या रकमेच्या 75 टक्के रकमेसाठी ओव्हरड्राफ्ट किंवा कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे. एसबीआय या योजनेअंतर्गत युनिव्हर्सल पासबुक देते, जेणेकरून तुम्ही शाखांमध्ये पैसे हस्तांतरित करू शकता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: