• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Vodafone Idea साठी येणार 'अच्छे दिन', 1000 कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता

Vodafone Idea साठी येणार 'अच्छे दिन', 1000 कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता

Vodafone Idea: कंपनीचे कर्ज जरूर कमी झाले आहे पण कंपनीवर अजूनही बरेच कर्ज शिल्लक देखील आहे. दरम्यान प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला कंपनीप्रति त्यांचा विश्वास दाखवण्यासाठी आणि कंपनीवर इतर गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी टोकन गुंतवणूक करू शकतात.

 • Share this:
  मुंबई, 12 ऑक्टोबर: गेल्या काही काळापासून आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या वोडाफोन आयडिया (Vodafone Idea Latest News) साठी 'अच्छे दिन' लवकरच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संकटांशी लढणाऱ्या या कंपनीला सरकारकडून दिलासा मिळू शकतो. कंपनीची स्थिती पाहता, त्यात भांडवल गुंतवण्याची (Investment in Vodafone Idea) नितांत गरज आहे. कंपनीचे कर्ज जरूर कमी झाले आहे पण कंपनीवर अजूनही बरेच कर्ज शिल्लक देखील आहे. मनीकंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहिनुसार प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला कंपनीप्रति त्यांचा विश्वास दाखवण्यासाठी आणि कंपनीवर इतर गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी टोकन गुंतवणूक करू शकतात. 1000 कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुमार मंगलम बिर्ला कंपनीमध्ये सुमारे 1000 कोटी (1000 crore investment in VI) रुपये गुंतवू शकतात. टेलिकॉम क्षेत्रासाठी मदत पॅकेजच्या घोषणेनंतर वोडाफोन आयडिया गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत कंपनीमध्ये प्रमोटरने पैशांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते या संकटाला सामोरे जाणाऱ्या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी पुढे येऊ शकतात. वाचा-Cibil Score चांगला असेल तर त्वरित मिळेल कर्ज, फॉलो करा या 6 महत्त्वाच्या Tips मनीकंट्रोलला सूत्रांकडून अशी देखील माहिती मिळाली आहे की कंपनीमध्ये प्रमोटर्स वोडाफोन पीएलसी आणि आदित्य बिर्ला ग्रुपच्या वतीने 10 हजार कोटी रुपयांची मोठी रक्कम गुंतवण्यासाठी सरकार आणि Vi यांच्यात कोणताही करार नाही. आदित्य समूहाचे अध्यक्ष केएम बिर्ला यांनी व्ही (VI) चे अध्यक्षपद सोडले आहे. पण दूरसंचार क्षेत्रासाठी मदत पॅकेजसाठी सरकारचे मन वळवण्याचा त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. यामुळे कंपनीकडे बाह्य रोख रक्कम येण्याची शक्यता आहे. थोडक्यात VI मध्ये पुन्हा चांगले दिवस येतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. वाचा-Remdesivirचं उत्पादन करणाऱ्या कंपनीवर ITची धाड, कपाटं-बॉक्समध्ये सापडले 142 कोटी सूत्रांकडून अशीही माहिती मिळाली आहे की, केएम बिर्ला यांच्याकडून ही टोकन गुंतवणूक बिर्ला ग्रुपच्या कोणत्याही लिस्टेड कंपनीद्वारे होऊ शकते. पण केएम बिर्ला त्यांच्या मालकीच्या कंपनीद्वारे वैयक्तिकरित्या ही गुंतवणूक करतील अशी शक्यता सर्वाधिक आहे. या संदर्भात आदित्य बिर्ला ग्रुप, वोडाफोन पीएलसी आणि व्ही कडून मनीकंट्रोलला कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: