Home /News /money /

SBI Alert! हे काम लवकरात लवकर पूर्ण न केल्यास बँकिंगमध्ये येतील समस्या, खात्यावरही होईल परिणाम

SBI Alert! हे काम लवकरात लवकर पूर्ण न केल्यास बँकिंगमध्ये येतील समस्या, खात्यावरही होईल परिणाम

स्टेट बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ग्राहकांना एक अलर्ट दिला आहे. ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठी हा अलर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे

    नवी दिल्ली, 07 ऑगस्ट: भारत आता डिजिटल होत आहे. बरेचसे डिजिटल व्यवहार आपण आता करतो आहोत. अशा वेळी सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे सायबर सुरक्षेसाठी बँकाही काळजी घेतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India SBI) ही देशातली सर्वांत मोठी बँकही वेळोवेळी ग्राहकांना सावधानतेचा इशारा देत असते. आता स्टेट बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ग्राहकांना एक अलर्ट दिला आहे. ‘आमच्या बँकिंग सेवा विनाअडथळा सुरू रहाव्यात यासाठी तसंच त्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये यासाठी आमच्या ग्राहकांनी पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhar card) लिंक करून घ्यावं असा सल्ला आम्ही त्यांना देत आहोत.’ असं ट्वीट एसबीआयने केलं आहे. याचाच अर्थ ही दोन्ही कार्डं लिंक केली नाहीत तर ग्राहकांना सेवांमध्ये अडचणी येऊ शकतात. हे वाचा-RBI Monetary Policy: रेपो रेटमध्ये बदल नाही, तुमच्या कर्जावर काय होईल परिणाम? दतीच्या आत तरी ग्राहकांनी ही दोन्ही कार्डं लिंक करावी तसं न केल्यास बँकेचे व्यवहार करण्यास अडचणी येऊ शकतात. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासंबंधी काही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया. भरावा लागेल दंड खरं तर आधार आणि पॅन कार्ड लिंक करणं (PAN-Aadhaar Card Linking) गरजेचं असल्याचं सरकारने या आधीही अनेकदा सांगितलं आहे. त्यासाठी शेवटची मुदत अनेक वेळा देण्यात आली आहे आणि ग्राहकांच्या सोयीसाठी ती मुदत पण बरेचदा वाढवून देण्यात आल आहे. 30 सप्टेंबर 2021 ही तारीख अंतिम असून त्या आधी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं बंधनकारक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसं केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड अवैध ठरेल आणि त्यामुळे तुम्हाला दंड भरून त्याची वैधता सुरू करून घ्यावी लागेल. हे वाचा-ही सरकारी बँक देतेय कर्जावर विशेष सवलत, 30 सप्टेंबपर्यंत ही सेवा फ्री! अशाप्रकारे करा लिंक आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्ही इन्कम टॅक्सच्या नव्या https://www.incometax.gov.in/iec/foportal वेबसाइटवर जा. त्यानंतर तिथं उपलब्ध सेवांमध्ये Link Aadhar वर क्लिक करा. एक नवं पेज उघडेल. त्यात तुमचा PAN, आधार नंबर, आधार कार्डावर लिहिलेलं तुमचं नाव आणि मोबाइल नंबर (Mobile Number) भरावा लागेल. जर तुमच्या आधार कार्डावर केवळ तुमच्या जन्माचं वर्षंच लिहिलं असेल तर तुम्हाला - ‘I have only year of birth in Aadhaar card’ या पर्यायाला टिक करावी लागेल. याठिकाणच्या व्यक्तींना मिळेल सूट आसाम, मेघालय, जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आताच हे आधार आणि पॅनचं लिंकिंग केलं नाही तरीही चालणार आहे असं बँकेनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 नुसार नॉन रेसिडेंट व्यक्तींनीही (Non-Resident) हे लिंकिंग केलं नाही तरी चालू शकेल. ज्यांचं वय गेल्यावर्षी 80 किंवा त्यापेक्षा अधिक झालं आहे अशा व्यक्तींनीही लिंकिंग केलं नाही तरीही चालेल. जे भारतीय नागरिक नाहीत त्यांनाही हे लिंकिंग करण्याची गरज नाही असंही बँकेने स्पष्ट केलं आहे.
    First published:

    Tags: Aadhar card, Pan card, SBI, Sbi account, Sbi alert

    पुढील बातम्या