मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBI Monetary Policy: रेपो रेटमध्ये काही बदल नाही, जाणून घ्या तुमच्या कर्जावर काय होईल परिणाम?

RBI Monetary Policy: रेपो रेटमध्ये काही बदल नाही, जाणून घ्या तुमच्या कर्जावर काय होईल परिणाम?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी दिलेल्या माहितीनुसार रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम राहणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी दिलेल्या माहितीनुसार रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम राहणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी दिलेल्या माहितीनुसार रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम राहणार आहे.

मुंबई, 06 ऑगस्ट: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वित्तिय धोरण समितीच्या (RBI MPC) झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी दिलेल्या माहितीनुसार,  रेपो रेट (Repo Rate) 4 टक्क्यांवर स्थिर राहणार आहे. शिवाय रिव्हर्स रेपो रेट (Reverse Repo Rate) 3.35 टक्क्यांवर स्थिर आहे. तर जबकि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट (MSFR) आणि बँक रेट 4.25 टक्के असेल. आर्थिक धोरण समितीने यावेळी ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

रेपो रेट म्हणजे काय?

दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही ग्राहकांना देण्यात येणाऱ्या कर्जांचेही दर वाढतात.

हे वाचा-RBI Monetary Policy: रेपो रेट 4% कायम राहणार,जाणून घ्या RBI पॉलिसीतील ठळक मुद्दे

स्वस्त दरात मिळेल गृहकर्ज

गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी व्याजदर हा महत्त्वाचा फॅक्टर असतो. गृहकर्ज हे दीर्घकालीन कर्ज असतं. आरबीआयने ऑक्टोबर 2019 पासून फ्लोटिंग रेट अनिवार्य केला आहे. बँक अधिकतर कर्ज फ्लोटिंग रेटवर देते. हे रेपो रेटशी जोडण्यात येते, अर्थात रेपो रेट कमी झाला किंवा वाढला त्याआधारे व्याज दर कमी होतो किंवा वाढतो. यालाच फ्लोटिंग रेट म्हणतात.

रेपो रेट स्थिर राहण्याचा अर्थ असा आहे की जे कर्ज घेण्याची योजना आखत आहेत त्यांना आता देखील स्वस्त दरात कर्ज मिळू शकतं. त्यांना आधीच्याच दराने कर्ज मिळेल. मात्र जर तुमचं 5 वर्ष जुनं झालं असेल तर तुम्हाला व्याजदर एकदा तपासून घ्यावे लागतील. जर तुमचे होम लोन रेपो रेटशी लिंक नसेल तर तुम्ही लिंक करुन घेऊ शकता.

हे वाचा-Gold Price Today: आज खरेदी करा स्वस्त सोनं! सातत्याने उतर आहेत गोल्ड रेट्स

स्वस्त दरात मिळेल ऑटोलोन

वाहन कर्ज जास्तीत जास्त 5 ते 7 वर्षांसाठी असतं आणि यावरील व्याजदर फिक्स असतो. तुम्ही जर नवीन कर्ज घेण्यासाठी जाणार असाल तर तुम्हाला स्वस्त दरात कर्ज मिळेल. सध्याच्या ग्राहकांबाबत बोलायचे झाले तर कमीत कमी 2 वर्ष जुनं ऑटो लोन स्विच करण्याबाबत विचार करू शकता. दरम्यान स्विच करण्याआधी फ्लोअर चार्ज तपासून घ्या

वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, सध्या वाढणार नाहीत व्याजदर

रेपो रेट स्थिर असणार आहे याचा अर्थ सध्या व्याजदर वाढणार नाहीत. चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास नवीन पर्सनल लोन घेणाऱ्यांना व्याजदरात फायदा मिळेल. जास्त क्रेडिट स्कोअर यामध्ये फायद्याचा ठरेल. सध्या पर्सनल लोन घेतलेल्या ग्राहकांना व्याजदरात विशेष फायदा मिळणार नाही.

First published:
top videos

    Tags: Rbi, Rbi latest news