मराठी बातम्या /बातम्या /मनी /SBI नंतर आता ही सरकारी बँक देतेय गृह, वाहन आणि सोनेकर्जावर विशेष सवलत, 30 सप्टेंबपर्यंत ही सेवा फ्री!

SBI नंतर आता ही सरकारी बँक देतेय गृह, वाहन आणि सोनेकर्जावर विशेष सवलत, 30 सप्टेंबपर्यंत ही सेवा फ्री!

या बँकेने व्याजदराबाबतच्या घोषणेअंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत गोल्ड लोन (Gold Loan), गृहकर्ज आणि वाहन कर्ज (Car Loan) यावरील प्रोसेसिंग फी (Processing Fee) वर सूट दिली आहे.

या बँकेने व्याजदराबाबतच्या घोषणेअंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत गोल्ड लोन (Gold Loan), गृहकर्ज आणि वाहन कर्ज (Car Loan) यावरील प्रोसेसिंग फी (Processing Fee) वर सूट दिली आहे.

या बँकेने व्याजदराबाबतच्या घोषणेअंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत गोल्ड लोन (Gold Loan), गृहकर्ज आणि वाहन कर्ज (Car Loan) यावरील प्रोसेसिंग फी (Processing Fee) वर सूट दिली आहे.

नवी दिल्ली, 06 ऑगस्ट: तुम्ही जर बँक ऑफ महाराष्ट्रचे (Bank of Maharashtra) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्याद्वारे संचालित असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रने गृहकर्जावरील (Home loan) व्याजदर कमी केले आहेत. शिवाय व्याजदराबाबतच्या घोषणेअंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत गोल्ड लोन (Gold Loan), गृहकर्ज आणि वाहन कर्ज (Car Loan) यावरील प्रोसेसिंग फी (Processing Fee) वर सूट दिली आहे.

काय आहेत नवीन दर?

बँक गृहकर्जावर 6.90 टक्के आणि वाहन कर्जावर 7.30 टक्के व्याजदर आकारते. आता या ऑफरअंतर्गत वेळेत होम लोनचे हप्ते भरल्यास 2 EMI फ्री होतील अर्थात तुम्हाला दोन ईएमआय भरावे लागणार नाहीत. कार आणि होम लोन अंतर्गत 90 टक्क्यापर्यंत कर्ज मिळेल. वेळेआधी कर्ज चुकवल्यास किंवा आंशिक पेमेंटवर शुल्क आकारले जाणार नाही. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड लोन स्कीममध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे. 7.10 टक्के व्याज दराने 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जात आहे.

हे वाचा-Gold Price Today: आज खरेदी करा स्वस्त सोनं! सातत्याने उतर आहेत गोल्ड रेट्स

झिरो प्रोसेसिंग फी

1 लाख रुपयांपर्यंतच्या गोल्ड लोनवर झिरो प्रोसेसिंग फी आहे. बँकेचे कार्यकारी संचालक हेमंत टामटा म्हणाले की, रिटेल बोनान्झा-मान्सून धमाका ऑफरमुळे ग्राहकांना कमी दर आणि प्रोसेसिंग फी ऑफरमध्ये सवलत मिळणार आहे.

हे वाचा-कागदपत्र जमा केल्याशिवाय PF मधून काढता येतील 1 लाख, कसा मिळेल या सुविधेचा फायदा

SBI देखील देत आहे सवलत

देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणाऱ्या SBI ने गृहकर्जावरील (SBI Hone Loan) प्रोसेसिंग फीस (SBI Loan Processing Fees) वर 100 टक्के सूट देण्यासह मान्सून धमाका ऑफरची (SBI Monsoon Dhamaka offer) घोषणा केली आहे.  SBI Monsoon Dhamaka offer 31 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असणार आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार या लिमिटेड पीरिएड ऑफरमुळे ग्राहकांना मोठा लाभ होईल

First published:
top videos

    Tags: Home Loan, Instant loans, Loan, Money, Pay the loan, Sbi home loan