मुंबई, 20 ऑगस्ट: तुम्ही जर देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे (
State Bank of India Update) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एसबीआयने त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. एसबीआयने त्यांच्या खातेधारकांना (
SBI account holder) लवकरात लवकर त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक (
PAN-Aadhaar card Link) करा. बँकेच्या मते, जर ग्राहकाने हे काम निश्चित सीमेपर्यंत पूर्ण नाही केले तर त्यांच्या बँकिंग सेवेवर परिणाम होऊ शकतो.
सरकारकडून पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करणं (
PAN-Aadhaar linking) अनिवार्य करण्यात आलं आहे. सध्या पॅन-आधार लिंक करण्याची तारीख 30 सप्टेंबर आहे. अशावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील पॅन आणि आधार लवकरात लवकर लिंक करण्याचं आवाहन केलं आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या खातेधारकांची संख्या 46 कोटीवर पोहोचली आहे. या ग्राहकांनी पॅन-आधार लिंक केले नाही तर त्यांच्या बँकिंग सेवा बाधित होऊ शकतात.
हे वाचा-3 दिवसात 60 पैशांनी स्वस्त झालं डिझेल, पेट्रोलचे दर किती उतरले?
बँकेने अशी माहिती दिली आहे की, पॅन आधार लिंक करणं अनिवार्य आहे. तुम्ही www.incometax.gov.in वर भेट देऊन Link Aadhaar वर क्लिक करुन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. याकरता डेडलाइन 30 सप्टेंबर आहे. कोणतीही असुविधा टाळण्यासाठी लवकरात लवकर हे काम पूर्ण करा. पॅन आणि आधार कार्ड लिंक न झाल्यास डेडलाइननंतर तुमच्या चालू सेवा प्रभावित होऊ शकतात. तुमच्या खात्यावर याचा परिणाम होऊ शकतो.
ऑनलाइन करता येईल लिंक
तुम्ही इन्कम टॅक्सच्या नवीन वेबसाइटच्या आधारे माहित करुन घेऊ शकता की तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही. जाणून घेण्याकरता इन्कम टॅक्स वेबसाइटवर जा, त्याठिकाणी आधार कार्डावरील नाव, तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा. आधार कार्डवर केवळ जन्माचं वर्ष असेल तर तसा पर्याय निवडा. कॅप्चा टाकून लिंक आधारवर क्लिक करा. अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुमचं आधार पॅन कार्डशी लिंक होईल.
हे वाचा-Fixed Deposit: बँक की Post Office कुठे मिळेल एफडीवर सर्वाधिक व्याज? वाचा सविस्तर
SMS च्या माध्यमातून करा पॅन-आधार लिंक
SMS च्या माध्यमातून पॅन-आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला UIDPAN<स्पेस>12 अंकी आधार क्रमांक<स्पेस>10 अंकी पॅन कार्ड क्रमांक टाइप करुन 567678 किंवा 56161 या क्रमांकांवर पाठवावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.