Home /News /money /

Petrol-Diesel Price Today: 3 दिवसात 60 पैशांनी स्वस्त झालं डिझेल, पेट्रोलचे दर किती उतरले?

Petrol-Diesel Price Today: 3 दिवसात 60 पैशांनी स्वस्त झालं डिझेल, पेट्रोलचे दर किती उतरले?

Petrol-Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी कपात केली आहे. जाणून घ्या काय आहेत आजचे इंधनाचे दर

    नवी दिल्ली, 20 ऑगस्ट: सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) आज सलग तिसऱ्या दिवशी कपात केली आहे. दरम्यान आज पेट्रोलचे दर मात्र स्थिर आहेत. डिझेलचे दर आज 20 पैशांपर्यंत कमी झाले आहेत. दरम्यान त्यामुळे गेल्या तीन दिवसात 60 पैशांपर्यंतची घसरण डिझेलच्या किंमतीत झाली आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Price in Mumbai) 107.83 रुपये आणि डिझेलचे दर (Diesel Price in Mumbai) 96.84 रुपये प्रति लीटर आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता रिव्हाइज करता येतात. पेट्रोलच्या दरात शेवटची वाढ 17 जुलै 2021 रोजी झाली होती. अर्थात महिनाभरापेक्षा पण जास्त कालावधीत पेट्रोलचे दर बदलले नाही आहेत. 17 जुलै रोजी देखील पेट्रोलचे दर 30 पैशांनी वधारले होते. पेट्रोल-डिझेलचे आजचे भाव >> दिल्ली - पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.27 रुपये प्रति लीटर >> मुंबई - पेट्रोल 107.83 रुपये और डीजल 96.84 रुपये प्रति लीटर >> चेन्नई - पेट्रोल 101.47 रुपये आणि डिझेल 93.84 रुपये प्रति लीटर हे वाचा-SBI ग्राहकांसाठी ऑफर्सचा धमाका! गृहकर्जासह कार-गोल्ड आणि पर्सनल लोनवर मोठी सवलत >> कोलकाता - पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 92.32 रुपये प्रति लीटर >> बंगळुरु - पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 94.65 रुपये प्रति लीटर >> लखनऊ -पेट्रोल 98.92 रुपये आणि डिझेल 89.61 रुपये प्रति लीटर अशाप्रकारे तपासा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. हे वाचा-PNB ग्राहकांसाठी खूशखबर! गृहकर्ज घेताना मिळणार ही सवलत, 30 सप्टेंबर शेवटची तारीख तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and Diesel price cut, Petrol price, Petrol price hike

    पुढील बातम्या