मुंबई, 10 जुलै: सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण अपेक्षा करत असतं की एक छोटासा ब्रेक तर हवाच! मात्र बऱ्याचदा ते शक्य होत नाही. बँकेत काम करणाऱ्यांना देखील सुट्टी मिळवणं कठीण असतं. मात्र RBI ने बँकेमध्ये काही विशिष्ट पदांवर काम करणाऱ्यांसाठी सुट्टींची खास योजना आणली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI Reserve Bank Of India) बँक कर्मचाऱ्यांना (Bank Employee) एक मोठं गिफ्ट दिलं आहे. आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, ट्रेजरी आणि करन्सी चेस्टसह संवेदनशील पदांवर काम करणाऱ्या बँक कर्मचार्यांना वर्षाकाठी किमान 10 दिवसांची सरप्राईज रजा (Surprise Leave) मिळेल. कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना ही रजा अचानक दिली जाईल.
RBI च्या बँकांना सूचना
आरबीआयने ग्रामीण विकास बँका आणि सहकारी बँकांसह बँकांना जोखीम व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांअतर्गत (Risk Management Guidelines) काही सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये अनपेक्षित रजा देण्याचे धोरण तयार करण्यास सांगितले आहे. या सुट्टीदरम्यान संबंधित बँक कर्मचाऱ्याला अंतर्गत/कॉर्पोरेट इमेल वगळता प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन स्वरुपाच्या कोणत्याही कामाची जबाबदारी दिली जाणार नाही. सर्वसाधारण उद्देशाने अंतर्गत/कॉर्पोरेट ईमेलची सुविधा बँक कर्मचार्यांना उपलब्ध आहे.
हे वाचा-मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी या बँकेची खास ऑफर, उघडता येईल स्पेशल खातं!
RBI ने अपडेट केली मँडेटरी लीव्ह पॉलिसी
याआधी आरबीआयने एप्रिल 2015 मध्ये या मुद्द्यावर पहिल्यांदा जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात या अशाप्रकारच्या किती सुट्ट्या दिल्या जातील हे स्पष्ट केलं नव्हतं. रिझर्व्ह बॅंकेने संवेदनशील पदांवर किंवा संचालन क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी अनिवार्य अनपेक्षित रजा धोरण अपडेट केलं आहे आणि 23 एप्रिल 2015 रोजीचे परिपत्रक रद्द केले आहे.
हे वाचा-सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता 'हा' क्लेम करणं झालं अधिक सोपं
RBI ने बँकांना दिला 6 महिन्याचा कालावधी
आरबीआयने जारी केलेल्या सूचनांचे पालन बँकांना लवकरात लवकर करावं लागणार आहे. याकरता RBI ने सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे. बँकांना त्यांच्या संचालक मंडळाच्या मंजूर धोरणानुसार संवेदनशील पदांची यादी तयार करण्यास आणि वेळोवेळी यादीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. आरबीआयने बँकांना सहा महिन्यांत सुधारित सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank holidays, Money, Rbi, Rbi latest news