नवी दिल्ली, 10 जुलै: बँकांकडून विविध वयोगटातील ग्राहकांसाठी विविध योजना आणल्या जातात. दरम्यान काही बँका लहान मुलांसाठी देखील विशेष योजना राबवत असते. देशातील महत्त्वाची बँक असणार पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) देखील मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक महत्त्वाची सुविधा देतं. या अंतर्गत मुलांचं एक खास अकाउंट तुम्हाला उघडता येईल. या योजनेचं नाव ज्युनिअर सेव्हिंग फंड अकाउंट (Junior Saving Fund account) असं आहे. जर मायनरचं वर 10 वर्षापेक्षा जास्त आहे तर त्याच्या नावे देखील खातं काढता येईल. या खात्याकरता केवायसी (Know Your Customer KYC) आवश्यक आहे. जाणून घ्या या खात्याविषयी -यामध्ये मिनिमम बॅलन्स झिरो आहे -यामध्ये इनिशिअल डिपॉझिट देखील झिरो आहे. -केवायसी करता फोटो, ओळखपत्र आणि अॅड्रेस प्रुफ आवश्यक आहे -यामध्ये खातेधारकाला 50 पानांचं चेकबुक मोफत मिळतं -रोज 10 हजारापर्यंत NEFT ट्रान्झॅक्शन फ्री आहे हे वाचा- सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता ‘हा’ क्लेम करणं झालं अधिक सोपं -शाळा किंवा कॉलेमध्ये डिमांड ड्राफ्ट इश्यू करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारले जाणार नाही. -या खात्याअंतर्गत मुलांना Rupay एटीएम कार्ड जारी केलं जातं, त्या माध्यमातून त्यांना एका दिवसात जास्तीत जास्त 5000 रुपये काढता येतील पंजाब नॅशनल बँकेनं केलं हे ट्वीट बँकेने ट्वीट करत या ज्युनिअर सेव्हिंग फंड अकाउंटबाबत माहिती दिली आहे. बँकेने असं म्हटलं आहे की, तुमच्या मुलासाठी ज्युनिअर सेव्हिंग बँक अकाउंट उघडा आणि त्या बदल्यात त्याच्यासाठी सुरक्षित भविष्य मिळवा.
Open a Junior Saving Fund account for your champ and get a secured future in return.
— Punjab National Bank (@pnbindia) July 10, 2021
Know more: https://t.co/WFcuHsGZeY#JuniorSavingFund pic.twitter.com/psF57X3YTm
या मायनर अकाउंचे रुपांतरण मुलाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सामान्य खात्यात केले जाते. तसे लिखित या अकाउंट होल्डरकडून खाते उघडताना घेतले जाते. वयाच्या 18 व्या वर्षानंतर ते या खात्याचा वापर करू शकतात. यामध्ये ओव्हड्राफ्टची सुविधा मिळत नसली तरी नॉमिनेशनची सुविधा मिळते. या योजनेतील खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाइल बँकिंगची सुविधा दिली जाते. मात्र यावरुन ऑनलाइन ट्रान्झॅक्शन त्यांना करता येत नाही. शिवाय ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील नाही मिळत.