नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: सध्याच्या काळाचा डिजिटल करन्सीमधील
(Digital Currency) गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक जण क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक
(Investment in Cryptocurrency) करत आहेत. मात्र आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन
(Finance Minister Nirmala Sitaraman) यांनी या क्रिप्टोकरन्सीला पर्याय म्हणून डिजिटल रुपया
(Digital Rupee) आणण्याचा घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. मात्र ही भारतीय डिजिटल करन्सी कशी असेल याबद्दल जाणून घेऊया. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ब्लॉकचेन
(BlockChain Technology) आणि इतर तंत्रज्ञानाच्या मदतीने RBI 2022-23 मध्ये डिजिटल रुपया जारी केला जाईल. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
ब्लॉकचेन टेक्नोलॉजी हा क्रिप्टोकरन्सीचा कणा असल्याचे म्हटले जाते. मात्र ब्लॉकचेनचा वापर केवळ सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्येच नाही तर इतर अनेक क्षेत्रांमध्ये होऊ शकतो आणि होत आहे. एक सुरक्षित आणि विकेंद्रित तंत्रज्ञान म्हणून ब्लॉकचेनची ओळख आहे. जे हॅक करणे किंवा टँपर करणे जवळजवळ अशक्य आहे.
Budget 2022 : सर्वसामान्यांना दिलासा, घर बांधण्याचा खर्च कमी होणार, काय आहे कारण?
ब्लॉकचेन म्हणजे काय?
ब्लॉकचेन समजून घेण्यासाठी, त्याची डेटाबेसशी तुलना करूया. डेटाबेस म्हणजे कोणत्याही सिस्टमच्या इन्फॉर्मेशन कलेक्सन. उदाहरणार्थ, समजा रुग्णालयाच्या डेटाबेसमध्ये रुग्ण, कर्मचारी, औषध, रुग्णांच्या येण्या-जाण्याची इत्यादी माहिती असेल तर ही सर्व माहिती डेटाबेसमध्येच राहील. ब्लॉकचेन हे देखील डेटाबेससारखे आहे. हे अनेक कॅटगरीजमध्ये माहिती गोळा करते. या ग्रुप्सना ब्लॉक्स म्हणतात आणि हे ब्लॉक्स इतर अनेक ब्लॉक्सशी जोडलेले असतात, जे एक प्रकारे डेटाची साखळी बनवतात. म्हणूनच या सिस्टमला ब्लॉकचेन म्हणतात. सामान्य डेटाबेसच्या विपरीत, ब्लॉकचेन एका ऑथरिटीद्वारे कंट्रोल केले जात नाही. हे डिझाईनच अशाप्रकारे केलं आहे की ते यूजर्सच चालवतील.
Budget 2022 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त? आणि काय महाग? वाचा सविस्तर...
ब्लॉकचेन कसे काम करते?
सोप्या भाषेत सांगायचे तर, ब्लॉकचेन एक डिजिटल लेजर
(Ledger) आहे आणि त्यावर होणारा कोणताही व्यवहार चेनशी जोडलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरवर दिसतो. याचा अर्थ असा की ब्लॉकचेनमध्ये कुठेही व्यवहार होतो, त्याचे रेकॉर्ड संपूर्ण नेटवर्कवर नोंदवले जातात. याला डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी
(Distributed Ledger Technology) म्हणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.