नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी, 1 फेब्रुवारी रोजी चौथा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. पण सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार? सर्वसामन्यांचा खर्च वाढणार की दिलासा मिळणार, यावर एक नजर टाकुया. काय स्वस्त होणार? चामड्याच्या वस्तू, कपडे, कृषी साहित्य, पॅकेजिंग बॉक्स, मोबाईल फोन चार्जर, रत्ने आणि दागिने स्वस्त होतील. रत्ने आणि दागिन्यांवरचे कस्टम ड्युटी 5 टक्के करण्यात आली आहे. कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील कस्टम ड्युटीही 5 टक्के करण्यात आली आहे. MSME ना आधार देण्यासाठी स्टील स्क्रॅपवरील कस्टम ड्युटी सूट एका वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. तेलावरील कस्टम ड्युटी कमी. देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी मोबाईल फोन चार्जर, ट्रान्सफॉर्मर इत्यादींवर कस्टम ड्युटीमध्ये सूट देण्यात आली आहे. काय महाग होणार? आयात शुल्कातून सूट काढून भांडवली वस्तूंवर 7.5 टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे. इमिटेशन ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे जेणेकरून त्याची आयात कमी करता येईल. परदेशी छत्रीही महागणार आहे. अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा » 60 लाख नोकऱ्या दिल्या जातील. » पुढील 3 वर्षांत 400 नवीन वंदे भारत रेल्वे चालवल्या जातील. » 3 वर्षात 100 PM गति शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील. » 1.5 लाख पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग अंतर्गत येतील. पोस्ट ऑफिसमध्येही आता ऑनलाइन ट्रान्सफर शक्य होणार आहे. » 2022-23 मध्ये 80 लाख नवीन घरे बांधली जातील. » देशात डिजिटल विद्यापीठ तयार केले जाईल. » 20,000 कोटी रुपये खर्चून 25 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जातील. » देशातील 5 मोठ्या नद्यांना जोडण्यासाठी जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीनेही काम केले जाईल. » 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग सुरू करण्यात येणार आहे. » 2022-23 मध्ये ई-पासपोर्ट लागू केला जाईल. » शहरांच्या विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची (Center of Excellence) स्थापना केली जाईल. » एक राष्ट्र, एक नोंदणी योजना (One Nation, One Registration) सुरू केली जाईल. त्यामुळे व्यवसाय करणे सोपे जाईल. » इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.