मराठी बातम्या /बातम्या /मनी /

RBI ची मोठी घोषणा! इंटरनेटशिवाय ट्रान्सफर करता येणार पैसे, काय आहे Offline Payment ची योजना?

RBI ची मोठी घोषणा! इंटरनेटशिवाय ट्रान्सफर करता येणार पैसे, काय आहे Offline Payment ची योजना?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI Latest News) ग्राहकांसाठी खास सुविधा देऊ केली आहे. ज्याद्वारे तुम्ही इंटरनेटशिवाय (Transfer Money Without Internet) पैसे हस्तांतरित करू शकता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI Latest News) ग्राहकांसाठी खास सुविधा देऊ केली आहे. ज्याद्वारे तुम्ही इंटरनेटशिवाय (Transfer Money Without Internet) पैसे हस्तांतरित करू शकता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI Latest News) ग्राहकांसाठी खास सुविधा देऊ केली आहे. ज्याद्वारे तुम्ही इंटरनेटशिवाय (Transfer Money Without Internet) पैसे हस्तांतरित करू शकता.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर: तुम्ही जर पैशांचे व्यवहार ऑनलाइन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाी आहे. विशेषत: जर तुमच्या परिसरात इंटरनेट व्यवस्था व्यवस्थित नसेल किंवा ही व्यवस्थाच नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI Latest News) ग्राहकांसाठी खास सुविधा देऊ केली आहे. ज्याद्वारे तुम्ही इंटरनेटशिवाय (Transfer Money Without Internet) पैसे हस्तांतरित करू शकता. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी शुक्रवारी एमपीसीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा करताना या सेवेविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने देशभरात ऑफलाईन पद्धतीने पेमेंट करण्यासाठी एक प्रणाली आणली आहे. ऑफलाईन पद्धतीने पेमेंट करण्याच्या या व्यवस्थेचे तीन पायलटही आतापर्यंत देशात राबवण्यात आले आहेत, त्यानंतर आता ही योजना संपूर्ण देशात राबवली जाईल.

ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा नाही आहे, ऑफलाइन पेमेंट व्यवस्थेचा (Offline Payment System) विशेष फायदा होईल. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार ही सुविधा देशभरात लागू केली जाणार आहे. ज्या ठिकाणांपर्यंत अद्याप इंटरनेट सुविधा पोहोचली नाही आहे त्यांच्यासाठी ऑफलाइन पेमेंट व्यवस्था फायद्याची ठरेल.

RBIने बदलला बँक व्यवहारासंबंधित महत्त्वाचा नियम, 2 लाखांऐवजी पाठवता येणार 5 लाख

अखेर देशभरात लाँच होणार ही योजना

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या योजनेची घोषणा गेल्यावर्षी 6 ऑगस्ट 2020 रोजी केली होती. याबाबत अजूनही चाचणी सुरू आहे. दरम्यान सप्टेंबर 2020 ते जून 2021 पर्यंत या प्रयोगाचे तीन पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आले आहेत. यामध्ये यश आल्यानंतर आता संपूर्ण देशात ही योजना लाँच करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या पायलट प्रोजेक्टमध्ये कमीत कमी 200 रुपये तर जास्तीत जास्त 2000 रुपये ट्रान्सफर करता येत होते. लवकरच आता सर्वांना ऑफलाइन पेमेंट करता येणार आहे.

SBI Alert! उद्यापासून 3 दिवस या वेळेत करता येणार नाहीत महत्त्वाचे बँक व्यवहार

या नियमातही RBI ने केला बदल

रिझर्व्ह बँकेने (RBI Latest News) आयएमपीएसद्वारे (IMPS-Immediate Payment Service) केल्या जाणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली आहे. आता 2 लाख रुपयांऐवजी तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपये या सुविधेद्वारे ट्रान्स्फर करू शकता. याशिवाय आता आरटीजीएस (RTGS) व्यवहार आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास करता येणार आहेत. एनईएफटीद्वारे (NEFT) पैसे हस्तांतरित करण्यासाठी किमान मर्यादा नाही. म्हणजे तुम्ही कमीत कमी कितीही पैसे हस्तांतरित करू शकता; मात्र जास्तीत जास्त पैसे पाठवण्याची मर्यादा प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळी आहे.

First published:

Tags: Rbi, Rbi latest news, Shaktikanta das