नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर: देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी (Alert for SBI Customers) आहे. जर तुमचे देखील SBI मध्ये खाते असेल तर बँकेने तुमच्यासाठी अलर्ट जारी केला आहे. बँकेने सांगितले की, उद्यापासून तीन दिवस बँकेच्या काही विशेष सेवा काही तास काम करणार नाही. बँकेने ट्वीट करून ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे. कोणत्या सेवा राहणार बंद? एसबीआयने ट्विटरवर म्हटले आहे की, सिस्टम मेंटेनन्ससाठी बँकेच्या काही सेवा 09, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवा समाविष्ट असतील. बँक आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळोवेळी प्रणालीमध्ये अपग्रेड करत राहते, जेणेकरून ग्राहकांना डिजिटल सुविधा सहज मिळतील.
या वेळेत करता येणार नाहीत बँकिंग व्यवहार एसबीआयने एका ट्वीटद्वारे सांगितले की, या सेवा 09 ऑक्टोबरच्या रात्री 12:20 ते 02:20 पर्यंत बंद राहतील. 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी रात्री 11:20 ते 1:20 पर्यंत या सेवा उपलब्ध होणार नाहीत. मेंटेनन्ससाठी बँकेच्या काही सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. ग्राहकांना या वेळेत येणाऱ्या अडचणीबाबत बँकेने दिलगिरी व्यक्त केली आहे. Ola Cars: केवळ टॅक्सी सेवा नाही तर आता खरेदी करा जुनी-नवी वाहनं सुद्धा ग्राहकांना चांगला बँकिंग अनुभव मिळावा याकरता बँक UPI प्लॅटफॉर्म अपडेट करत आहे. बँकेने याबाबत माहिती दिली आहे. या दरम्यान यूपीआय ट्रान्झॅक्शन्स बंद राहतील. याआधी देखील बँकेने मेंटेनन्ससाठी अशाप्रकारे काही सेवा बंद केल्या होत्या.