मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBIने बदलला बँक व्यवहारासंबंधित महत्त्वाचा नियम, 2 लाखांऐवजी पाठवता येणार 5 लाख

RBIने बदलला बँक व्यवहारासंबंधित महत्त्वाचा नियम, 2 लाखांऐवजी पाठवता येणार 5 लाख

इंटरनेट बँकिंगद्वारे पैशांचे व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI Latest News) आयएमपीएसद्वारे (IMPS-Immediate Payment Service) केल्या जाणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली आहे.

इंटरनेट बँकिंगद्वारे पैशांचे व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI Latest News) आयएमपीएसद्वारे (IMPS-Immediate Payment Service) केल्या जाणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली आहे.

इंटरनेट बँकिंगद्वारे पैशांचे व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI Latest News) आयएमपीएसद्वारे (IMPS-Immediate Payment Service) केल्या जाणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली आहे.

    नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर: सर्वच बँका सध्या इंटरनेट बँकिंगची (internet banking) सुविधा देत आहेत. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना बँकेचे व्यवहार करण्यासाठी प्रत्यक्ष बँकेत जाण्याची गरज भासत नाही. घरबसल्या इंटरनेट बँकिंगद्वारे बँकेची सर्व कामं होत आहेत. बँक खातेदार इंटरनेट बँकिंगचा वापर करून RTGS, NEFT, IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करणं, बँक खात्यातली शिल्लक रक्कम तपासणं आदी कामं काही क्षणात करू शकतात. त्यामुळे ग्राहकांचीही इंटरनेट बँकिंगला मोठी पसंती आहे.

    इंटरनेट बँकिंगद्वारे पैशांचे व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI Latest News) आयएमपीएसद्वारे (IMPS-Immediate Payment Service) केल्या जाणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली आहे. आता 2 लाख रुपयांऐवजी तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपये या सुविधेद्वारे ट्रान्स्फर करू शकता. याशिवाय आता आरटीजीएस (RTGS) व्यवहार आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास करता येणार आहेत. म्हणजेच तुम्ही RTGS द्वारे कोणत्याही वेळी ऑनलाइन पैसे हस्तांतरित करू शकता. आरबीआयने ग्राहकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला आहे.

    आज काय दराने खरेदी कराल सोनं? रेकॉर्ड हायपेक्षा 9300 रुपयांनी आहे स्वस्त

    एनईएफटीद्वारे (NEFT) पैसे हस्तांतरित करण्यासाठी किमान मर्यादा नाही. म्हणजे तुम्ही कमीत कमी कितीही पैसे हस्तांतरित करू शकता; मात्र जास्तीत जास्त पैसे पाठवण्याची मर्यादा प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळी आहे.

    एनईएफटीव्यतिरिक्त ग्राहक आरटीजीएस आणि आयएमपीएसद्वारे पैसे हस्तांतरित करू शकतात. आरटीजीएसद्वारे एका वेळी 2 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. जास्तीत जास्त रकमेची मर्यादा वेगवेगळ्या बँकांमध्ये भिन्न आहे. आयएमपीएसद्वारे आतापर्यंत एका दिवसात 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम हस्तांतरित करता येत होती. आता ही मर्यादा वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली आहे.

    RBI Monetary Policy : RBI ने व्याजदरात कोणताही बदल केला नाही

    दरम्यान, रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची (एमपीसी) बैठक द्वैमासिक बैठक 6 ऑक्टोबर रोजी सुरू झाली आणि 8 ऑक्टोबरपर्यंत चालली. आरबीआयने रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात काहीच बदल केला नाही. तीन दिवसांच्या बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं, की रेपो दर 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. तसंच रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के ठेवण्यात आला आहे. याआधी 22 मे 2020 रोजी रेपो दरात बदल करण्यात आला होता.

    First published: