Home /News /money /

SBI ला मोठा झटका! RBI ने ठोठावला 1 कोटी रुपयांचा दंड, हे आहे कारण

SBI ला मोठा झटका! RBI ने ठोठावला 1 कोटी रुपयांचा दंड, हे आहे कारण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अर्थात आरबीआयने (RBI Latest News) RBI ने नियामांचे उल्लंघन केल्यामुळे 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

    नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर: एखाद्या बँकेने नियमांचं उल्लंघन केल्यास किंवा बँकेच्या व्यवहारांध्ये कमतरता आढळून आल्यास देशाची केंद्रीय बँक असणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या बँकांवर दंड ठोठावला जातो. आता या कारवाईचा झटका देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI Latest News) बसला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अर्थात आरबीआयने (RBI Latest News) RBI ने नियामांचे उल्लंघन केल्यामुळे 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियामकीय अनुपालनात कमतरता आल्यामुळे एसबीआयवर हा दंड (RBI imposes 1 crore penalty on SBI) ठोठावण्यात आला आहे. RBI ने शुक्रवारी एका निवेदनात असे म्हटले आहे की, 16  नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या एका आदेशात हा दंड ठोठावण्याच आला आहे. केंद्रीय बँकेने अशी माहिती दिली आहे की, आर्थिक स्थिती संदर्भात 31 मार्च 2018 आणि 31 मार्च 2019 या दरम्यान एसबीआयच्या देखरेख मूल्यांकनाबाबत एक वैधानिक निरीक्षण करण्यात आले होते. हे वाचा-Personal Loan की Auto Loan? कोणतं कर्ज आहे तुमच्यासाठी चांगलं? जाणून घ्या फरक एसबीआयला आरबीआयची कारणे दाखवा नोटीस या आदेशानुसार, जोखीम मूल्यांकन अहवालाच्या तपासणीत बँकिंग नियमन कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन आढळले. SBI ने कर्जदार कंपन्यांच्या बाबतीत कंपन्यांच्या पेड-अप भाग भांडवलाच्या तीस टक्क्यांहून अधिक रकमेचे शेअर्स तारण ठेवले होते. आरबीआयने याबाबत एसबीआयला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बँकेकडून आलेल्या उत्तरानंतर बँकेवर 1 कोटी रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. हे वाचा-रिकरिंग डिपॉझिटच्या (RD) व्याजदरावर परिणाम करणारे हे आहेत महत्त्वपूर्ण घटक आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवरही ठोठावला होता एक कोटी रुपयांचा दंड अलीकडेच, मध्यवर्ती बँकेने पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड (पीपीबीएल) वर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की Paytm पेमेंट्स बँकेला पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अॅक्ट, 2007 (PSS Act) च्या कलम 26 (2) अंतर्गत गुन्ह्यासाठी हा दंड ठोठावला जात आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Rbi, Rbi latest news, SBI, SBI Bank News

    पुढील बातम्या