मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Personal Loan की Auto Loan? कोणतं कर्ज आहे तुमच्यासाठी चांगलं? जाणून घ्या संपूर्ण फरक

Personal Loan की Auto Loan? कोणतं कर्ज आहे तुमच्यासाठी चांगलं? जाणून घ्या संपूर्ण फरक

Personal Loan की Auto Loan यामधील फरक समजून घ्या

Personal Loan की Auto Loan यामधील फरक समजून घ्या

वाहन (How to Apply for Auto Loan) आणि वैयक्तिक कर्जे (How to Apply for Personal Loan) घेणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 26 नोव्हेंबर:आपल्याला अचानक काही पैशांची गरज भासली तर आपण मित्रांकडून, नातेवाईकांकडून काही रक्कम उधार घेतो. अर्थात ती अगदी लगेच किंवा अल्पावधीत परत करावी लागते. मात्र आपल्याला घर, वाहन घ्यायचे असेल किंवा परदेश प्रवासाला जायचं असेल, घराचं रिनोव्हेशन करायचे असेल किंवा अन्य काही कारणांसाठी मोठी रक्कम लागणार असेल तर अशावेळी मित्र, नातेवाईकांकाडून ती घेणे शक्य नसते. आता याकरता बँका (bank Loan process), वित्तीय संस्था मदतीसाठी हजर असतात. त्यामुळे अशा मोठ्या रकमेच्या गरजेसाठी आता बहुतांश सर्व लोक बँकेकडून (Bank) किंवा वित्तीय संस्थेकडून (Financial Institution loan) कर्ज (Loan) घेतात. लोकांच्या सोयीसाठी गृह (Home loan)आणि वाहन (Auto/Car) या कर्जासाठी व्याजदर, परतफेडीची सुविधा याबाबत विशेष सुविधा दिल्या जातात. कारण ही कर्जे घेणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याच कारणांसाठी ही कर्जे दिली जातात. मात्र घर आणि वाहन वगळता इतर अन्य वैयक्तिक खर्चासाठी (Persoanl Loan) लागणाऱ्या कर्जाला वैयक्तिक कर्ज म्हणतात. आजकाल त्यात गृह, वाहन (How to Apply for Auto Loan) आणि वैयक्तिक कर्जे (How to Apply for Personal Loan) घेणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. या तिन्ही प्रकारच्या कर्जात फरक आहे. त्याबद्द्ल आज आपण जाणून घेऊया...

वाहन कर्ज (Auto Loan)

आपल्याला कार घ्यायची (Car) असेल किंवा कोणतेही वाहन (Vehicle) घ्यायचे असेल तर बँक किंवा वित्तीय संस्था जे कर्ज देतात त्याला वाहन कर्ज (Auto Loan) म्हणतात. हे कर्ज फक्त वाहनासाठीच दिले जाते. म्हणजे या नावाखाली दिलेल्या कर्जाच्या रकमेचा वापर अन्य कारणांसाठी करता येत नाही. वाहनाची किंमत चुकवण्यासाठीच त्याचा वापर करावा लागतो.

वाहनाची जी किंमत असेल त्याच्या 80 ते 90 टक्के रक्कम बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज स्वरुपात देते. उर्वरीत रक्कम डाउन पेमेंट (Down Payment)म्हणून कर्जदाराला आपल्या खिशातून भरावी लागते. वाहन कर्जाचे हप्ते बँकेतील तुमच्या कर्ज खात्यातून थेट कार डीलरच्या खात्यात जमा होतात. वाहन कर्ज घेतल्यानंतर त्याची पूर्ण परतफेड होईपर्यंत वाहनावर बँकेचा हक्क असतो. कर्ज परतफेड थकल्यास बँक कार किंवा वाहन जप्त करू शकते.

Investment tips: Mutual Funds मध्ये गुंतवणुकीचे हे आहेत फायदे

वाहन कर्जाचा व्याजदर तुलनेने कमी असतो. वाहन कर्ज अगदी सहजपणे मिळते. या कर्जासाठी वाहन हेच तारण असते. त्यामुळे हे सुरक्षित कर्ज मानले जाते. हे कर्ज बुडण्याची शक्यता कमी असते.  क्रेडीट स्कोअर मध्यम असला तरी हे कर्ज मिळण्यात अडचण येत नाही.

वैयक्तिक कर्ज (Personal Loan)

वैयक्तिक कर्ज  (Personal Loan) हे गृह आणि वाहन वगळता अन्य कारणांसाठी घेतले जाते. उदाहरणार्थ परदेश प्रवास, घराची दुरुस्ती, मुला, मुलींचे विवाह अन्य काही वैयक्तिक खर्च याकरता मोठ्या रकमेची गरज असल्यास बँक किंवा वित्तीय संस्थेकडे वैयक्तिक कर्ज अर्थात पर्सनल लोनसाठी अर्ज करता येतो.  कर्ज मंजूर झाल्यानंतर या कर्जाच्या रकमेवर ती कशासाठी खर्च करावी याचे बंधन नसते. कर्जाची रक्कम तुम्ही कशासाठीही खर्च करू शकता. या कर्जाची परतफेड करण्यासाठी निश्चित असा आराखडा नसतो. जसे वाहन किंवा गृह कर्जासाठी दरमहा ठराविक रकमेचा हप्ता निश्चित केलेला असतो. तो बँकेतून परस्पर संबधित खात्यात जमा होत असतो. तसे इथे नसते.

या कर्जाचा व्याजदरही गृहकर्ज, वाहन कर्ज यापेक्षा खूप अधिक असतो. कारण हे कर्ज असुरक्षित कर्ज (Unsecured Loan) मानले जाते. या कर्जाच्या परतफेडीसाठी कोणतेही तारण नसते. गृह किंवा वाहन कर्जाच्या वसुलीसाठी बँकेकडे घर किंवा वाहन जप्तीचा पर्याय असतो. कर्जदाराने वेळेत कर्ज परतफेड (Repayment) न केल्यास वाहन किंवा घर जप्त करून त्याचा लिलाव करून बँक आपले कर्ज परत घेते; पण वैयक्तिक कर्जात वसुलीसाठी असा कोणताही पर्याय नसतो. त्यामुळे याचा व्याजदर अधिक असतो. हे असुरक्षित कर्ज मानले जात असल्याने हे कर्ज देताना अतिशय कठोर निकष लावले जातात.

या कर्जाच्या मंजुरीत क्रेडीट स्कोअर (Credit Score)अत्यंत महत्त्वाचा असतो. कर्जदाराचा क्रेडीट स्कोअर चांगला असेल तरच बँका किंवा वित्तीय संस्था हे कर्ज मंजूर करतात. क्रेडीट स्कोअर चांगला असेल तर कर्जदार वेळेत कर्ज परतफेड करत असल्याची खात्री बँकेला पटते, त्यामुळे वैयक्तिक कर्ज मंजूर होण्यात अडचण येत नाही. तेच आधी एखादे कर्ज घेतले असेल आणि त्याची परतफेड वेळेत केलेली नसेल तर क्रेडीट स्कोअर कमी असतो, अशावेळी वैयक्तिक कर्ज मिळण्यात अडचणी येतात. हे कर्ज फेडण्याची कर्जदाराची क्षमता किती आहे याची काटेकोरपणे पडताळणी केली जाते. त्यामुळे वाहन किंवा गृह कर्जासारखे हे कर्ज अगदी सहजपणे (Easily) मिळत नाही.

नवी कार घेताय? Car loan घेताना आवश्यक आहेत हे पात्रता निकष आणि कागदपत्रं

वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज हे पूर्णतः वेगवेगळे प्रकार असून त्यात मोठा फरक आहे. वाहन कर्ज हे कमी व्याजदराने, सहजपणे मिळू शकते, मात्र त्याचा वापर वाहन घेण्यासाठी केला जातो. तर वैयक्तिक कर्ज कशासाठी वापरावे यावर बंधन नसले तरी त्याचा व्याजदर उच्च असतो आणि ते मिळण्यासाठी कठोर निकष पूर्ण करावे लागतात. त्यामुळे वैयक्तिक कर्ज अत्यंत गरजेचे असेल तेव्हाच घेणे योग्य ठरते.

First published:

Tags: Loan, Money