मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Special News : रिकरिंग डिपॉझिटच्या व्याजदरावर परिणाम करणारे हे आहेत महत्त्वपूर्ण घटक

Special News : रिकरिंग डिपॉझिटच्या व्याजदरावर परिणाम करणारे हे आहेत महत्त्वपूर्ण घटक

प्रमुख बॅंका रिकरिंग डिपॉझिटवर नक्की किती देतात व्याजदर जाणून घ्या

प्रमुख बॅंका रिकरिंग डिपॉझिटवर नक्की किती देतात व्याजदर जाणून घ्या

रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) म्हणजेच आरडी (RD) हा एक सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय म्हणता येईल. रिकरिंग डिपॉझिटच्या माध्यमातून मिळाणारे रिटर्न्स (Returns) तसेच व्याजदर (Interest Rate) हा तत्कालीन मार्केट स्थितीवर अवलंबून असतो. `आरडी`मध्ये तुम्ही अल्प, मध्यम किंवा दिर्घमुदतीत बचत करू शकता.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : सध्याच्या काळात बचत (Saving) करणं अत्यावश्यक मानलं जातं. जीवनातील भविष्यकाळातील काही उदिद्ष्टपूर्तींसाठी आज केलेली बचत निश्चितच उपयुक्त ठरू शकते. बचतीच्या अनुषंगानं आर्थिक नियोजन (Financial Planning) करताना आज आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यातील रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) म्हणजेच आरडी (RD) हा एक सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय म्हणता येईल. रिकरिंग डिपॉझिटच्या माध्यमातून मिळाणारे रिटर्न्स (Returns) तसेच व्याजदर (Interest Rate) हा तत्कालीन मार्केट स्थितीवर अवलंबून असतो. `आरडी`मध्ये तुम्ही अल्प, मध्यम किंवा दिर्घमुदतीत बचत करू शकता. अनेक बॅंका `आरडी`साठी विविध योजना किंवा स्किम (Scheme) राबवत असतात. या स्किम्सच्या माध्यमातून तुम्ही नेमकी कोणत्या उदेदशानं बचत करताय त्या अनुषंगानं पर्याय उपलब्ध करून दिले जातात.

`आरडी`तील बचतीवर बॅंका ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज दर देतात. मात्र सर्वसामान्य नागरिकांना मिळणारा व्याज दर हा त्यांच्या वयावर अवलंबून असतो. तसेच स्किमनिहाय `आरडी`चे व्याज दरही निरनिराळे असतात. `एफडी`च्या तुलनेत `आरडी`मध्ये दरमहिन्याला गुंतवणूक करण्याचा आणि लागू असलेल्या दरानुसार व्याज मिळवण्याचा पर्यायही उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. मात्र कालावधी, बचत करणाऱ्या व्यक्तीचं वय यासारखे काही घटक असतात की जे `आरडी`च्या व्याज दरावर परिणाम करू शकतात. याविषयी जाणून घेऊया सविस्तर...

आरडी ही बचतीच्या अनुषंगानं सुरक्षित असते, त्यातून मिळणारा फायदाही चांगला असतो, परंतु, काही बाबी या फायद्यावर म्हणजेच व्याज दरावर परिणाम करणाऱ्या असतात.

कालावधी (Period) : तुमच्या `आरडी`चा कालावधी हा व्याज दर ठरवण्यात महत्त्वाचा घटक ठरतो. कारण हा कालवधी `आरडी`त पैसे गुंतवण्याचा कालावधी असतो. मध्यम कालावधीकरिता केलेल्या बचतीवर जास्त व्याज दर मिळू शकतो. काही बॅंका 10 वर्षांवर म्हणजेच दिर्घमुदतीच्या `आरडी`वर जास्त व्याज दर देतात. परंतु असा व्याजदर नेहमीच मिळतो असं नाही कारण काही बॅंका 1 वर्ष आणि 10 वर्षाच्या बचतीवर समान व्याज दर देतात.

अकाउंटचा प्रकार (Types Of Account) : आरडी अकाउंटच्या प्रकारानुसार तुम्हाला व्याज दर मिळतो. रेग्युलर सेव्हिंग अकाउंटमध्ये एनआरई (NRE) किंवा एनआरओ (NRO)अकाउंटच्या तुलनेत अधिक व्याजदर मिळतो. मात्र काही बॅंका या दोन्ही अकाउंटवर समान व्याज दर ऑफर करतात.

हे वाचा - MPSC Guide: उमेदवारांनो, घरबसल्याच होऊ शकतो MPSC परीक्षेचा उत्तम अभ्यास; केवळ अशा पद्धतीनं करा तयारी

बॅंका आणि वित्तीय संस्था (Bank And Financial Institutions) : तुम्हाला मिळणाऱ्या मॅच्युरिटीच्या रकमेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करणारा हा घटक आहे. कारण `आरडी`ची सुविधा बॅंका किंवा वित्तीय संस्थांमार्फत दिली जाते. बॅंकांमध्ये `आरडी`च्या माध्यमातून गुंतवणूक करणं हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. एखादी व्यक्ती मान्यताप्राप्त कंपनीच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करू शकते. मात्र संबंधित व्यक्तीनं गुंतवणूक किंवा बचत करण्यापूर्वी ठेवींवर क्रेडिट रेटिंग तपासणं आवश्यक आहे. एफएए किंवा एफएए सारख्या चांगल्या क्रेडिट रेटिंग असलेल्या कंपनीच्या आरडी योजनेत अन्य कॉर्पोरेट कंपन्यांच्या तुलनेत गुंतवणूक करणं योग्य ठरू शकतं.

वय (Age): आज बहुतांश बॅंका रिकरिंग डिपॉझिट वर ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज देतात. हा दर नियमित व्याज दराच्या तुलनेत 0.5 टक्के प्रतिवर्ष अधिक असतो. मात्र जेष्ठ नागरिकांच्या वयाचे निकष वित्तीय संस्थेच्या नियमानुसार वेगवेगळे असू शकतात. ज्युनिअर आरडी अकाउंट वर अधिक व्याज दर मिळतो. मात्र या सर्व बाबी बॅंकेवर अवलंबून असतात.

बॅंकेची निवड (Bank Selection) : वेगवेगळ्या बॅंकांमध्ये व्याजदर काही अंशी निराळे असू शकतात. मात्र सध्या टॉप बॅंकांचा व्याज दर हा 7 टक्के प्रतिवर्षी पासून सुरू होतो. राष्ट्रीयीकृत बॅंका (Nationalised Banks) दरवर्षी 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज दर देतात.

हे वाचा - या नागरिकांसाठी सर्वात फायद्याची आहे RD, स्कीमच्या या प्रकारांमध्ये करता येईल गुंतवणूक

योजनांवरील ऑफर्स (Schemes On Offers) : सध्या विविध बॅंका रिकरिंग डिपॉझिट योजना राबवत आहेत. त्यात कॉर्पोरेशन बॅंकेच्या (Corporation Bank) लक्षाधीश योजनेच्या माध्यमातून तुम्हाला योजनेच्या शेवटी दहा लाख रुपये मिळू शकतात. या योजनेतील डिपॉझिटवर सर्वाधिक 9.25 टक्के प्रतिवर्षी व्याजदर दिला जात आहे. आरडी योजनेच्या ऑफर्सवर तुमचा व्याज दर अवलंबून असतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

सध्याचं आर्थिक वातावरण (Current Economic Environment) :रिकरिंग डिपॉझिट योजना ऑफर करणाऱ्या बॅंका किंवा वित्तीय संस्था या आर्थिक परिस्थिती जशी बदलते त्यानुसार त्यांचे व्याजदर अद्ययावत करत असतात. `आरबीआय`नं (RBI) रेपो रेटमध्ये केलेला बदल, महागाई आदी घटक यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे `आरडी`चे व्याज दर निश्चित होण्यासाठी प्रचलित आर्थिक परिस्थिती किंवा वातावरण हे देखील महत्त्वाची भूमिका बजावतात, हे यातून स्पष्ट होतं.

हे वाचा - सर्दी-पडशाचे विषाणू कोरोनाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवतात; नवीन संशोधनातील माहिती

त्यामुळे तुम्ही जर `आरडी`च्या माध्यमातून बचत करण्याचा निर्णय घेत असाल, तर निर्णयापूर्वी व्याज दरावर परिणाम करणाऱ्या या सर्व घटकांचा बारकाईनं अभ्यास करणं आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला देखील उपयुक्त ठरू शकतो. तुम्हाला ज्या उदिदष्टपूर्तीसाठी बचत करायची आहे, ते साध्य होण्यासाठी हा अभ्यास किंवा सल्ला निश्चितच उपयोगी ठरू शकतो. कारण योग्य व्याज दर मिळाला तरच कोणत्याही प्रकारची बचत किंवा गुंतवणूक यशस्वी झाली हे सिध्द होतं.

First published:

Tags: Bank services, Fixed Deposit