RBIकडून सामान्यांसाठी खूशखबर! सोन्याच्या दागिन्यांवर मिळणार जास्त कर्ज, बदलला हा नियम

RBIकडून सामान्यांसाठी खूशखबर! सोन्याच्या दागिन्यांवर मिळणार जास्त कर्ज, बदलला हा नियम

कोरोनाच्या या संकटकाळात आरबीआयने सामान्य नागरिक आणि छोट्या व्यवसायिकांना दिलासा देत दागिन्यांवर मिळणाऱ्या कर्जाचे मूल्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात वाचा सविस्तर

  • Share this:

नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : आरबीआयने (Reserve Bank of India) सामान्य नागरिकांना दिलासा देत सोन्याच्या दागिन्यांवर कर्जाचे मूल्य (Gold Loan to Value LTV) वाढवले आहे. आता 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकेल. आतापर्यंत दागिन्यांच्या मुल्याच्या 75 टक्के कर्ज मिळत असे. तुम्ही ज्या बँक किंवा नॉन-बँकिंग फायनान्सिंग कंपनीमध्ये गोल्ड लोनसाठी अर्ज कराल, त्याठिकाणी आधी तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याची शुद्धता आणि गुणवत्ता तपासण्यात येते. सोन्याच्या गुणवत्तेच्या हिशोबाने तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ठरवली जाते. बँकांकडून सोन्याच्या दागिन्यांच्या एकूण मुल्याच्या 75 टक्के रक्कम कर्ज म्हणून दिली जात असे. आता हे मूल्य 90 टक्के केले आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी याबाबत घोषणा केली.

तज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या या संकटकाळात आरबीआयकडून करण्यात आलेली ही घोषणा फायदेशीर ठरेल. कारण सामान्य नागरिक किंवा छोटे व्यापारी सोन्याच्या दागिन्यांवर अधिक कर्ज घेऊ शकतील. 31 मार्च 2021 पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे

(हे वाचा-अर्थव्यवस्था सुधारण्यास सुरुवात, EMI संदर्भात RBIची मोठी घोषणा)

सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेणाऱ्यांना सोन्याची शुद्धता तपासून कर्ज देण्यात येते. दरम्यान 18 ते 24 कॅरेट सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांना यातून चांगली रक्कम घेता येते.

काय आहे गोल्ड लोन?

गोल्ड लोन असे एक सुरक्षित कर्ज आहे, जे तुम्हाला उधार देणाऱ्या बँक किंवा एनबीएफसी मध्ये तुमच्याकडे असणारे सोने गहाण ठेवून मिळते. त्यानंतर या बँका किंवा एनबीएफसीकडून तुम्हाला सोन्याच्या बाजार मुल्याप्रमाणे रक्कम दिली जाते. तुम्हाला निश्चित कालावधीमध्ये ही रक्कम फेडावी लागते. तुम्ही हे कर्ज फेडल्यानंतर तुमचे सोने तुम्हाला परत देण्यात येते.

(हे वाचा-याठिकाणी गुंतवणूक करणाऱ्यांना मिळाला 90 दिवसात 700% नफा, तुमचाही होऊ शकतो फायदा)

गोल्ड लोन मिळवण्यासाठी एका पासपोर्ट फोटोसहित, तुमचे ओळखपत्र (पासपोर्ट, ड्राइव्हिंग लायसन्स, आधार कार्ड) आणि पत्त्याचा पुरावा (वीजबिल किंवा फोन बिल) द्यावे लागेल. पॅन कार्ड देखील द्यावे लागेल, PAN नसल्यास फॉर्म 60 जमा करावा लागेल. कोणतीही 18 वर्ष पूर्ण असणारी किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारी व्यक्ती गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकते.

कोणत्या प्रकारचे सोने गहाण ठेवू शकता?

तुम्ही कर्ज मिळवण्याकरता सोन्याचे दागिने गहाण ठेवू शकता. या दागिन्यांच्या शुद्धतेवरून तुम्हाला मिळणारी रक्कम निश्चित करण्यात येते. त्याचप्रमाणे वेगळे प्रोसेसिंग शुल्क देखील आकारण्यात येते. दरम्यान बँकांकडून सोन्याची बिस्किटे, नाणी किंवा सोन्याच्या विटा स्विकारल्या जात नाहीत.

सोने किती सुरक्षित राहते?

परवाना नसणाऱ्या बँका किंवा एनबीएफसीमध्ये तुमचे सोने हरवण्याची शक्यता असल्याने हे जोखमीचे काम आहे. त्यामुळे असा सल्ला देण्यात येतो की, विश्वसनीय उधार देणाऱ्या संस्थांकडून कर्ज घेण्यात यावे. कारण ते वोल्टमध्ये सुरक्षित राहते.  अशाठिकाणी सुरक्षेची गॅरंटी मिळते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 6, 2020, 5:58 PM IST

ताज्या बातम्या